आपल्या 'राणी'ला वाचवण्यासाठी मधमाशांच्या घोळक्याने दोन दिवस केला एका कारचा पाठलाग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:50 PM2019-05-31T15:50:24+5:302019-05-31T15:53:07+5:30

मधमाशांचा घोळका जर मागे लागला तर काय होतं हे तुम्ही सिनेमातही पाहिलं असेल आणि काहींनी तर प्रत्यक्षातही अनुभवलं असेल.

America swarm of bees follows car for 2 days because queen trapped in car | आपल्या 'राणी'ला वाचवण्यासाठी मधमाशांच्या घोळक्याने दोन दिवस केला एका कारचा पाठलाग!

आपल्या 'राणी'ला वाचवण्यासाठी मधमाशांच्या घोळक्याने दोन दिवस केला एका कारचा पाठलाग!

googlenewsNext

मधमाशांचा घोळका जर मागे लागला तर काय होतं हे तुम्ही सिनेमातही पाहिलं असेल आणि काहींनी तर प्रत्यक्षातही अनुभवलं असेल. मधमाशांचं एक वेगळंच रूप इथे बघायला मिळालं. मधमाशांच्या गॅंगने त्यांच्या राणीला वाचवण्यासाठी एका वृद्ध महिलेच्या कारचा तब्बल दोन दिवस पाठलाग केला.

वेल्सच्या हावर्ड फोर्डवेस्ट शहरात राहणारी ६८ वर्षीय कॅरोल होवार्थ जेव्हा त्यांच्या कारने बाजारात गेल्या होत्या. कार पार्किंगमध्ये पार्क करून त्या खरेदी करायला गेल्या. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, त्यांच्या कारमागे मधमाशांचा एक मोठा घोळका होता. हा मधमाशांचा घोळका त्यांच्या राणीला वाचवण्यासाठी आला होता. कारण त्यांची राणी त्या कारमध्ये अडकलेली होती.

मधमाशांची काळजी घेणाऱ्या एका टीमने या मधमाशांना बॉक्समध्ये बंद केलं. नॅशनल पार्कचे  रेंजर टोम मोसेस म्हणाले की, याआधी मी असा नजारा कधीही पाहिला नाहीये. आधीही मधमाशांना एखाद्या वस्तूमध्ये बसताना पाहिलं आहे. पण एवढा मोठा घोळका आधी कधीही पाहिला नाही. या टीमने एकत्र मिळून या मधमाशांना पकडलं होतं. पण ती वृद्ध महिला सकाळी उठून बघते तर काय? तिच्या कारच्या मागच्या बाजूला मधमाशांचा घोळका बसलेला होता. 

हे बघून कॅरोल होवार्थ सांगतात की, त्यांची राणी माझ्या कारमध्ये अडकलेली असल्याने त्या माझ्या कारचा पिच्छा सोडत नाहीयेत. त्यानंतर पुन्हा एकदा मधमाशांना पकडण्यासाठी टीमला बलवण्यात आलं आणि त्यांनी मधमाशांना दूर केलं. 

नॅशनल पार्कचे रेंजर टोम मोसेस यांनी सांगितलं की, मधमाशा तिथेच जातात जिथे त्यांची राणी जाते. त्या नेहमी त्यांच्या राणीच्या मागे फिरतात. त्यांची राणी जिथे राहते तिथेच त्या घर करतात.

Web Title: America swarm of bees follows car for 2 days because queen trapped in car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.