पतीला खूश करण्यासाठी 'तिला' बोलवलं, असं काही घडलं की पत्नीने घेतला घटस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 01:38 PM2022-02-11T13:38:07+5:302022-02-11T13:41:29+5:30
America : अमेरिकेच्या पोर्टलॅंडमध्ये राहणाऱ्या महिलेने पतीचा वाढदिवस यादगार बनवण्यासाठी आणखी एका महिलेला बोलवलं. जेणेकरून पती एकत्र दोघींसोबत संबंध ठेवण्याचा आनंद घेऊ शकेल.
आपल्या पतीला खूश करण्यासाठी एका महिलेने त्याच्या बर्थडेवर खास तयारी केली. पण या तयारी दरम्यान असं काही झालं की, महिलेने पतीसोबत घटस्फोट घेतला. अमेरिकेच्या (America) पोर्टलॅंडमध्ये (Portland) राहणाऱ्या महिलेने पतीचा वाढदिवस यादगार बनवण्यासाठी आणखी एका महिलेला बोलवलं. जेणेकरून पती एकत्र दोघींसोबत संबंध ठेवण्याचा आनंद घेऊ शकेल. पण यादरम्यान तिच्या आत लपवलेली भावना तिला समजली आणि लग्न मोडलं.
'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, पोर्टलॅंडच्या ओेरेगॉनमध्ये राहणारी ३६ वर्षीय महिला थेरेसा रोज (Theresa Rose) आपल्या लग्नाने आनंदी नव्हती. पण तिला याचं कारण माहीत नव्हतं. २०२० मध्ये तिने आपल्या पतीला खूश करण्यासाठी दुसऱ्या महिलेला बोलवलं, जेणेकरून तिघेही शारीरिक संबंधाचा आनंद घेऊ शकतील. त्यावेळी तिला ती लग्नात आनंदी नसण्याचं कारण समजलं. रोजला जाणीव झाली की, ती समलैंगिक (Lesbian) आहे. यानंतर तिने पतीपासून घटस्फोट घेतला आणि दुसऱ्या महिलेसोबत राहू लागली.
नव्या नात्यात जास्त आनंदी आहे महिला
दोन मुलांची आई रोजने सांगितलं की, 'त्या रात्री मला समजलं की, पतीसोबत माझं नातं फार चांगलं का नव्हतं. मला जाणीव झाली की, ज्या गोष्टीचा मला शोध होता, ती मला एखाद्या पुरूषाकडून मिळू शकत नाही. त्यामुळे मी घटस्फोट घेतला आणि ती आठवड्यानंतर Jacqui Mettle सोबत डेटिंग सुरू केली. आता मी जास्त आनंदी आहे. त्या महिलेने मला जाणीव करून दिली की, माझ्या लाइफमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती'.
रोजचा जन्म एका कॅथलिक परिवारात झाला होता आणि बालपणापासून तिला हे सांगण्यात आलं होतं की, समलैंगिक लोक नरकात जातात. ती म्हणाली की, कडक शिस्तीमुळे तिला महिलांप्रति तिच्या भावनांना लपवावं लागलं. लग्नानंतर रोजने तिच्या पतीलाही याबाबत सांगितलं होतं. पण त्याने काहीही समजून घेण्यास नकार दिलाा. रोजच्या घटस्फोटावर तिच्या परिवारातील लोक नाराज आहेत. पण आता तिला कुणाची काही परवा नाही.