हजारो वर्षानंतर पुन्हा जिवंत होण्यासाठी लोक देत आहेत कोट्यावधी रूपये, लॅबमध्ये गोठवून ठेवले मृतदेह!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 02:16 PM2024-07-16T14:16:18+5:302024-07-16T14:17:22+5:30
आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेत यावर कामही सुरू आहे. इथे यासाठी एक लॅब आहे ज्यात श्रीमंत लोकांचं मृत शरीर क्रायोप्रिजर्वेशन प्रक्रिये द्वारे भविष्यासाठी सुरक्षित ठेवले आहेत.
मृत्यू जीवनातील सगळ्यात मोठं सत्य आहे. म्हणजे ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू कधीना कधी अटळ आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. तरीही काही लोक असे असतात ज्यांना अमर व्हायचं असतं. काही मृत लोकांना हजारो वर्षानंतर पुन्हा जिवंत होऊन जगायचं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेत यावर कामही सुरू आहे. इथे यासाठी एक लॅब आहे ज्यात श्रीमंत लोकांचं मृत शरीर क्रायोप्रिजर्वेशन प्रक्रिये द्वारे भविष्यासाठी सुरक्षित ठेवले आहेत.
या लोकांचं मत आहे की, भविष्यात जर काही टेक्निक आली तर मृत शरीरांना पुन्हा जिवंत केलं जाऊ शकेल. अशात तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, ही टेक्निक काय आहे आणि यासाठी किती खर्च लागतो? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
ही आधुनिक लॅब अमेरिकेत आहे. इथे अल्कोर लाईफ एक्सटेंशन फाऊंडेशन नावाची क्रायोनिक्स कंपनी मृतदेहांना भविष्यासाठी सुरक्षित ठेवत आहे. या कंपनीमध्ये सध्या १४०० लोक काम करतात. या कंपनीने एकट्या अमेरिकेत २३० मृतदेहांना संरक्षित केलं आहे. तर जगाबाबत सांगायचं तर या कंपनीने आतापर्यंत ५०० मृतदेह संरक्षित केले आहेत.
कसं केलं जातं हे काम?
ही कंपनी मृतदेहांना क्रायोप्रिजर्वेशन पद्धतीने संरक्षित करते. म्हणजे मृतदेह क्रायोनिक्स ट्यूबमध्ये -१९६ डिग्रीच्या खालच्या तापमानात ठेवले जातात. तेच जिवंत कोशिका, ऊतक आणि इतर गोष्टी शून्य ते खालच्या तापमानात संरक्षित केल्या जातात.
किती येतो खर्च?
सरासरी एक मृतदेह क्रायोप्रिजर्वेशन करण्यासाठी साधारण १.८ कोटी रूपये खर्च येतो. तेच जर एखाद्या मृत व्यक्तीच्या मेंदुला फ्रीज करायचं असेल तर त्यासाठी जवळपास ६६ लाख रूपये खर्च लागतो.