अबब... ३५ लाख रुपये बोनस!!; अशा कंपनीत नोकरी मिळू दे रे महाराजा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 11:59 AM2019-12-12T11:59:08+5:302019-12-12T12:00:51+5:30
दिवाळीतही बोनस न मिळणारे अनेक कर्मचारी कंपनीच्या नावाने खडे फोडताना अनेकदा पाहिले असतील. पण वर्षाच्या शेवटी कधी कुठे बोनस मिळाल्याचं बघितलं का?
दिवाळीतही बोनस न मिळणारे अनेक कर्मचारी कंपनीच्या नावाने खडे फोडताना अनेकदा पाहिले असतील. पण वर्षाच्या शेवटी कधी कुठे बोनस मिळाल्याचं बघितलं का? बरं कुणाला बोनस १० हजार मिळाला तरी अनेकजण हवेत असतात. अशात एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना तब्बल ३५-३५ लाख रूपये बोनस वाटलाय.
२०१९ हे वर्ष संपत आलंय. लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचं आणि पार्टी करण्याचं प्लॅनिंग करत आहेत. अशात अमेरिकेतील एका कंपनीने आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ३५-३५ लाख रूपये बोनस वाटलाय. कंपनीने त्यांच्या सर्वच १९८ कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी ७१ कोटी रूपये खर्च केला.
अमेरिकेतील बाल्टीमोरमधील सेंट जॉन प्रॉपर्टीज नावाच्या कंपनीने हा कारनामा केलाय. हॉलिडे पार्टी सुरू होती त्याचवेळी बोनसची घोषणा करण्यात आली. न्यूयॉर्क पोस्टनुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यलयानुसार बोनसची रक्कम मिळेल. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना ३५ लाख रूपये बोनस दिला आहे.
कंपनीने यावर्षात चांगलं प्रदर्शन केल्याने हा बोनस वाटल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. यूएसमधील ८ राज्यांमध्ये कंपनीने ऑफिस, रिटेल स्टोर आणि गोदामाचे २ कोटी स्क्वेअर फूट घरांचं बांधकाम केलं. बोनसचा चेक स्वीकारल्यावर अनेकांच्या डोळ्यात अश्रूही आले होते. इतकेच नाही तर कंपनीकडून दिला गेलेला हा बोनस कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या वार्षिकपेक्षा वेगळा आहे.