ढेकर आहे की डरकाळी! महिलेने कायम केला सगळ्यात जोरात ढेकर देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, ऐका आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 09:52 AM2023-08-04T09:52:17+5:302023-08-04T09:55:13+5:30
Loudest burp of female : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Record) त्यांच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंट एका अमेरिकन महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Loudest burp of female : जगभरात लोक वेगवेगळ्या गोष्टींसाठी वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करत असतात. यातील काही तर इतक्या अजब गोष्टींसाठीचे रेकॉर्ड असतात की, विश्वासच बसत नाही. मात्र वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करणंही सोपं नाही. त्यासाठी लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठे त्यांना यश मिळतं. सध्या एक महिला अशाच अजब रेकॉर्डसाठी चर्चेत आहे. तिने सगळयात जोरात ढेकर देण्याचा (Loudest burp of female) वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Record) त्यांच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंट एका अमेरिकन महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या महिलेने फारच अजब गोष्टीसाठी वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. तिने सगळ्यात जोरात ढेकर देण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. तिची ढेकर 107.3 डेसिबल इतकी मोजली गेली. या महिलेचं नाव किंबर्ली विंटर (Kimberly Winter burp queen) आहे.
याआधी हा रेकॉर्ड इटलीच्या एलिसा कॅगनोनी नावाच्या महिलेच्या नावावर होता. तिने 2009 मध्ये 107 डेसिबल इतकी जोरात ढेकर घेत रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. पुरूषांच्या श्रेणीत हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या नेविल शार्पच्या नावावर आहे. त्याने 2021 मध्ये 112.7 डेसिबल इतकी जोरात ढेकर दिली होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार किंबर्लीची ढेकर हॅंड ब्लेंडर (70-80 dB), इलेक्ट्रिक हॅंड ड्रिलर (90-95 dB) आणि अनेक मोटरसायकलच्या आवाजांपेक्षा (100-110 dB) जास्त जोरात होती.
विंटर म्हणाली की, तिने कॉफी आणि बीअरसोबत नाश्ता करून ढेकर देण्याची तयारी केली होती. विंटरची आतापर्यंतची सगळ्यात लांब ढेकर 9 सेकंदाची आहे.