१५व्या शतकातील अशी राणी जी पराभूत सैन्यातील एका सैनिकासोबत रात्र घालवून त्याला मारत होती!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 02:30 PM2019-10-05T14:30:51+5:302019-10-05T14:45:19+5:30
इतिहासाच्या पानांवर कितीतरी पराक्रमी राण्यांची नावे लिहिली गेली आहेत. या राण्यांनी त्यांच्या शक्तीने, हुशारीने नवा इतिहास लिहिला आहे.
(Image Credit : roar.media)
इतिहासाच्या पानांवर कितीतरी पराक्रमी राण्यांची नावे लिहिली गेली आहेत. या राण्यांनी त्यांच्या शक्तीने, हुशारीने नवा इतिहास लिहिला आहे. याच राण्यांपैकी एक होती राणी अमीना. आताच्या नॉर्थ-वेस्ट नायजेरियाच्या आणि तेव्हाच्या जरिया साम्राज्याचा विस्तार या राणीने कसा केला हे जाणून घेऊ.
जाजाऊ म्हणजे जरिया साम्राज्याचा विस्तार
असे म्हटले जाते की, राणी अमीनाने जरियाला असं विकसित केलं, जे त्यांच्या पिढीत कुणीच करू शकलं नसतं. राणी अमीनाला युद्ध कौशल चांगलंच अवगत होतं. हेच कारण होतं की, तिने तिचं साम्राज्य वाढवण्यासाठी अनेक युद्धांमध्ये विजय मिळवला. जरियाच्या राणीने तल्लख बुद्धी आणि ताकदीचा वापर करून किल्ल्यांचा आणि व्यापाराचाही विस्तार केला.
कुठे झाला होता जन्म?
(Image Credit : roar.media)
राणी अमीनाचा जन्म १५३३ मध्ये कडूनाच्या जाजा क्षेत्रात झाला होता. तिच्या आईचं नाव राणी बकवा द हाबे असं होतं. अमीनाच्या आजोबांचं निधन झाल्यावर तिची आईच जाजाऊ साम्राज्याची देखरेख करत होती. अमीनाने लहान वयातच युद्धाचं शिक्षण घेतलं होतं. तसेच ती आजोबांसोबत शासन निर्णयांमध्येही सहभाग घेत होती.
अमीनाचा छोटा भाऊ राजा
१५६६ मध्ये अमीनाच्या आईचं निधन झाल्यावर अमीनाचा भाऊ करामाला जाजाऊ साम्राज्याचा राजा करण्यात आलं. भावाच्या शासनकाळात अमीनाने जाजाऊच्या सैन्यात एक बहादूर योद्धा म्हणून आपली ओळख निर्माण केली. यादरम्यान त्यांनी धन आणि शक्ती दोन्ही मिळवली. पण १५७६ मध्ये करामाचं निधन झालं. आणि राजगादी अमीनाच्या हाती आली.
राणी बनताच अमीनाने सर्वातआधी जाजाऊशी संबंधित व्यापार मार्गांचा विस्तार केला. तसेच व्यापार करणाऱ्या लोकांना सुरक्षा देण्याचाही निर्णय तिने घेतला. इतकेच नाही तर अमीनाने साम्राज्याची सीमा तर वाढवलीच सोबतच साम्राज्य मजबूतही केलं.
(Image Credit : roar.media)
२० हजार लोकांच्या विशाल सेनेचं नेतृत्व
आपल्या शासन काळात अमीनाने २० हजार लोकांच्या विशाल सेनेचं नेतृत्व केलं होतं. त्यासोबतच तिने जिंकलेल्या शहरांचा समावेश आपल्या राज्यात केला होता. असेही म्हटले जाते की, अमीना ज्या राज्याला हरवत होती, त्या राज्याच्या एका सैनिकासोबत रात्र घालवत होती आणि सकाळी त्याचा जीव घेत होती. कारण तिच्याबाबत कुणाला काही माहीत पडू नये.
तसेच असेही म्हटले जाते की, तिला तिची शक्ती गमावण्याची भिती होती. त्यामुळेच तिने लग्न केलं नाही. जवळपास ३४ वर्ष अमीनाने जाजाऊवर राज्य केलं. अमीनाला 'वॉल्स ऑफ अमीना' म्हणूनही ओळखलं जातं. शेवटच्या श्वासापर्यंत ती लढत राहिली. ती नायजेरियातील बीदामध्ये एका युद्धात मारली गेली होती.