Anaconda Snake Attack: पाण्यात लपून बसलेल्या अॅनाकोंडाने मच्छीमारावर केला हल्ला; थरारक व्हिडिओ व्हायरल...

By ओमकार संकपाळ | Published: July 8, 2022 03:09 PM2022-07-08T15:09:54+5:302022-07-08T15:11:00+5:30

Anaconda Snake Attack: ही घटना ब्राझीलनमध्ये घडली असून, सुदैवाने त्या व्यक्तीला इजा झाली नाही.

Anaconda Snake Attack: An anaconda attacks on a fisherman from water; Thriller Video Viral | Anaconda Snake Attack: पाण्यात लपून बसलेल्या अॅनाकोंडाने मच्छीमारावर केला हल्ला; थरारक व्हिडिओ व्हायरल...

Anaconda Snake Attack: पाण्यात लपून बसलेल्या अॅनाकोंडाने मच्छीमारावर केला हल्ला; थरारक व्हिडिओ व्हायरल...

googlenewsNext

Anaconda Snake Attack: अनाकोंडा हा विषारी नसला तरीदेखील आकाराने जगातला सर्वात मोठा साप आहे. चित्रपटात हा अनाकोंडा साप माणसांना खाताना दाखवला जातो. प्रत्यक्षात असे घडत नाही, पण हा माणसांवर हल्ला करून जखमी करू शकतो. ताजी घटना ब्राझीलनमध्ये घडली आहे. एका मासे पकडणाऱ्या व्यक्तीवर पाण्यात लपून बसलेल्या अनाकोंडा (anaconda snake) सापाने हल्ला केला. 

व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय जोआओ सेवरिनो मध्य ब्राझीलमधील गोआस राज्यातील अरागुआया नदीमध्ये एका छोट्याशा नावेतून मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पाण्यात लपून बसलेला एक अॅनाकोंडा साप दिसला. ते त्या सापाच्या जवळ गेले, पण यावेळी अचानक सापाने त्यांच्यावर हल्ला केला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या सोशल मीडियावर या घटनेचे फुटेज चांगलेच व्हायरल होत आहे. यात साप पाण्यातून बाहेर उडी मारुन हल्ला करताना दिसतो. 

सुदैवाने इजा नाही
20 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पाण्यात बुडालेल्या लाकडाच्या बाजुला एक अनाकोंडा लपून बसलेला दिसत आहे. सेवरिनो (क्लिपमध्ये त्यांचा चेहरा दिसत नाही) त्या सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात साप हल्ला करतो. ही दृष्य पाहून तिथे उपस्थित सर्वजण घाबरतात आणि नंतर हसतात. सुदैवाने या हल्ल्यात सेवरिनो यांना कुठलीही इजा होत नाही.

बोआ जातीचा अनाकोंडा
मिळालेल्या माहितीनुसार, हा हिरव्या रंगाचा अॅनाकोंडा असून, याची लांबी 30 फूट आणि वजन 225 किलोपर्यंत वाढू शकते. हा बोआ जातीचा अनाकोंडा आहे. प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळणारा हा हिरव्या रंगाचा अॅनाकोंडा जगातील सर्वा मोठा साप आहे. नॅशनल ज्योग्राफिकनुसार, मादा साप नराच्या तुलनेत दुप्पट मोठी असते. हा साप जंगली डुक्कर, हरीण, पक्षी, सासव यांसारखे प्राणी खावून उदरनिर्वाह करतात.

Web Title: Anaconda Snake Attack: An anaconda attacks on a fisherman from water; Thriller Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.