बाबो! सलग १८ सेकंद एकाच दमात कोंबड्याने बांग दिली, मग...; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 05:45 PM2022-06-08T17:45:53+5:302022-06-08T17:46:03+5:30
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला. त्याला अनेकांनी कमेंट्स दिल्या.
उद्योगपती आनंद महिंद्रा(Anand Mahindra) सोशल मीडियावर विशेष म्हणजे ट्विटरवर खूप एक्टिव्ह असतात. अनेकदा त्यांचे ट्विट चाहत्यांसाठी प्रेरणादायी असतात. काही मोटिवेशनल तर कधी कधी फनी ट्विटही ते पोस्ट करत असतात. अलीकडेच महिंद्रा यांनी एका कोंबड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो सलग एकाच सुरात बांग देत असतो आणि त्यानंतर जे घडतं त्याने तुम्हीही पोटभरून हसाल.
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, हा माझ्या सिग्नल वंडर बॉक्समध्ये मिळाला. या कोंबड्याची कहानी आणि मेसेज समजण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर मी विचार केला की, या कोंबड्याच्या कथेबद्दल लोकांची मते गोळा करणे अधिक मनोरंजक असेल. तुम्ही लोक या बाबत तुमचे मत द्या असं त्यांनी विनंती केलीय. महिंद्रा यांनी ट्विट करत लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. काही मिनिटांतच या ट्विटला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.
In my #SignalWonderbox. I was trying to figure out the moral of this story. 😊 I then thought it would be far more interesting to crowdsource the best lesson to learn from this rooster’s tale. Your inputs please… pic.twitter.com/u1uSx0Doxp
— anand mahindra (@anandmahindra) June 8, 2022
व्हिडिओवर युजर्सच्या कमेंटचा पाऊस
या व्हिडीओवर एका युजरने प्राण जाईल पण वचन नाही अशी कमेंट केली आहे. हे रिएक्शन स्वतः आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केली होती, दुसर्या युजरने यातून काय शिकायला मिळालं त्याचे उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, जेव्हा तुम्ही अर्थ नसताना आवाज उठवता तेव्हा त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे, एकाने संस्कृत श्लोक शेअर करत लिहिले की जास्त करणे नेहमीच घातक ठरते. काही नेटिझन्सने सांगितले की या कोंबड्यापासून कधीही हार मानू नये ही शिकवण शिकायला मिळते.
आनंद महिंद्रा यांनी यापूर्वी कर्नाटकातील शृंगेरी मंदिराचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोत स्टील प्लेट्स एकावर एक ठेवल्या आहेत. सुंदर कलाकृतींचा ठसा उमटतो अशा पद्धतीने ते सजवलेल्या होत्या. महिंद्रा यांनी लिहिलं की, 'हे खूप सुंदर आहे. एखाद्या पुतळ्यासारखं.. कला, अचूकता आणि कार्यक्षमतेचा संगम. त्यांना एकत्र करण्याचा एक व्हिडिओ आहे का...' फोटो पोस्ट करणाऱ्या युजरने उत्तर दिले की त्याने हा व्हिडिओ बनवला नाही. परंतु पुढच्या वेळी तो मंदिरात गेल्यावर काळजी घेईल.