Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी शोधली Games Of Thrones ची भिंत: ट्विटरवर शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 10:41 PM2022-02-08T22:41:05+5:302022-02-08T22:41:31+5:30
Anand Mahindra Tweet : पाहा आनंद महिंद्रा काय म्हणाले?
महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख (Mahindra And Mahindra) आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते आपली मतं किंवा अनेक गोष्टी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअरही करतात. त्यांचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी नुकत्याच एका केलेल्या ट्वीटवरून आनंद महिंद्रा यांना Games Of Thrones आवडत असावं असं दिसतं.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर मिराथांग ग्लेशिअरचा एक फोटो शेअर केला आहे. गेम्स ऑफ थ्रोन्सची भिंत खरंच अस्तित्वात आहे, असंही त्यांन या फोटो सोबत लिहिलं आहे. गेम्स ऑफ थ्रोन्समध्ये The Wall एक कॅरेक्टरप्रमाणे रिफ्लेक्ट होते.
The Wall. From the Game of the Thrones.. So it does exist…🙂 https://t.co/5up7B3dncI
— anand mahindra (@anandmahindra) February 8, 2022
मिराथांग ग्लेशिअर अरुणाचल प्रदेशात स्थित आहे. ही देशातील सर्वात मोठ्या बर्फांच्या भितींपैकी एक आहे. अनेकदा अॅडव्हेन्चरचा आनंद घेणारे या ठिकाणी ट्रेकिंगलाही जातात. आनंद महिंद्रा यांनी ग्लेशिअरचा जो फोटो शेअर केला आहे, तो सत्यम बाबू यांनी क्लिक केला आहे. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून ते गुवाहाटीचे रहिवासी असल्याचं समजतं. तसंच सध्या ते मुंबईत आहेत. त्यांच्या प्रोफाईलवर काश्मीर, गुलमर्ग, सोनमर्गचे अनेक फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.