बाईकवर समोर बसली होती बायको अन् मागे ३७ खुर्च्या; फोटो पाहून आनंद महिंद्राही आश्चर्यचकित!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 08:18 PM2022-04-03T20:18:42+5:302022-04-03T20:19:48+5:30

Anand Mahindra Latest Tweet:  महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी रविवारी आणखी एक हटके फोटो शेअर केला. युजर्स या फोटोबद्दल उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

anand mahindra latest tweet mahindra group chairman share interesting photo of a moped rider | बाईकवर समोर बसली होती बायको अन् मागे ३७ खुर्च्या; फोटो पाहून आनंद महिंद्राही आश्चर्यचकित!

बाईकवर समोर बसली होती बायको अन् मागे ३७ खुर्च्या; फोटो पाहून आनंद महिंद्राही आश्चर्यचकित!

Next

Mahindra Group चे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी रविवारी एक हटके ट्विट केलं. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मोपेडवर एक व्यक्ती सुमारे ३७ खुर्च्या, अनेक चटई आणि त्याच्या पत्नीला घेऊन जात असल्याचं दिसतं. आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा फोटो व्हायरल झाला आहे. या ट्विटवर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत.

"आता आपल्याला लक्षात येईल की भारत जगात सर्वाधिक दुचाकी का बनवतो. आम्ही टू-व्हिलरची इंच इंच जागा कशी जास्तीत जास्त उपयोगात आणायची आणि  जास्त माल कसा न्यायचा याची आम्हाला चांगली माहिती आहे. आम्ही असेच आहोत", असं आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये नमदू केलं आहे. 

यूझर्सचा इंटरेस्टिंग रिप्लाय
महिंद्राच्या या पोस्टवर एका यूजरनं म्हटलं की, "त्यानं (मोपेड चालक) दोन्ही खुर्च्यांचा वरचा भाग रिकामा का ठेवला?". तर आणखी एका युझरनं परेड दरम्यान मोटारसायकलवर अप्रतिम कामगिरी करत असलेल्या जवानांचं छायाचित्र पोस्ट केलं आणि लिहिलं, "हे अतुल्य भारताचे सौंदर्य किंवा प्रतिभा आहे सर..."

आनंद महिंद्रा यांनी एका युजरचं ट्विट रिट्विट केलं आहे ज्यानं मोटारसायकलवर सैनिक साहसी कर्तब दाखवत असल्याचं छायाचित्र पोस्ट केलं आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक ट्विट रिट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एका ट्विटर युजरनं, "हे प्रेमाचं प्रतिक आहे" असं लिहिलं आहे.

Web Title: anand mahindra latest tweet mahindra group chairman share interesting photo of a moped rider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.