Anand Mahindra : कंटेनरच्या मागे लिहिलेलं Test Your Airbag Here; आनंद महिंद्रा म्हणाले, "ब्रिलियंट..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 08:05 PM2022-04-15T20:05:32+5:302022-04-15T20:06:35+5:30

Anand Mahindra Latest Tweet: दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात. ते सातत्यानं काही ना काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

Anand Mahindra: Test Your Airbag Here written on the back of the container; Anand Mahindra said, "Brilliant ..." | Anand Mahindra : कंटेनरच्या मागे लिहिलेलं Test Your Airbag Here; आनंद महिंद्रा म्हणाले, "ब्रिलियंट..."

Anand Mahindra : कंटेनरच्या मागे लिहिलेलं Test Your Airbag Here; आनंद महिंद्रा म्हणाले, "ब्रिलियंट..."

Next

Anand Mahindra Latest Tweet:  महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर (Social Media) खुप अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड फॉलोअर्सही आहेत. त्यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एका कंटेनरचा फोटो शेअर केला. या कंटेनरच्या नंबर प्लेटखाली "टेस्ट युअर एअरबॅग हिअर..." असं लिहिलेलं दिसत आहे. महिंद्रा यांनी हा फोटो शेअर करत "खुपच छान..." असं लिहिलं आहे.

त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरनं "ट्रक ज्ञान" असं कमेंट केलंय. तर आणखी एका नेटकऱ्यानं आणखी एका ट्रकचा फोटो शेअर केलाय आणि त्याच्या मागे पुष्पा चित्रपटाचा एक सीन दिसतोय. यासोबत "पुष्पा राज... झुकेगा नही..." असं लिहिलं आहे.



तर आणखी एका युझरनं दुसऱ्या ट्रकचा फोटो शेअर करत "लाँग व्हेईकल, कृपया ३० फुटांचं अंतर ठेवा" असं लिहिलंय. तर आणखी एकानं फोटो शेअर केला आहे. त्यात एका ट्रकवर लिहिलंय की "कृपया तुमची एअर बॅग इकडे टेस्ट करू नका. तुम्ही स्वर्गात जाल, पण पोलीस आम्हाला घेऊन जातील."

Web Title: Anand Mahindra: Test Your Airbag Here written on the back of the container; Anand Mahindra said, "Brilliant ..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.