प्राचीन काळात आपल्या हाताची बोटं कापत होते लोक, रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 10:14 AM2023-12-26T10:14:09+5:302023-12-26T10:14:38+5:30
अशी कामं करणाऱ्या लोकांना मानसिक रूग्णही म्हटलं जातं. पण आता एका स्टडीमधून खुलासा करण्यात आला तो हैराण करणारा आहे.
आजकाल बॉडी मॉडिफिकेशनच्या अनेक घटना समोर येत असतात. लोक वेगळे दिसण्यासाठी कधी ओठ मोठे करून घेतात तर कधी जिभेला दोन भागात कापतात. तर काहींनी आपली बोटं कापली.
अशी कामं करणाऱ्या लोकांना मानसिक रूग्णही म्हटलं जातं. पण आता एका स्टडीमधून खुलासा करण्यात आला तो हैराण करणारा आहे. यातून समोर आलं आहे की, प्राचीन काळातही असं केलं जात होतं.
न्यूयॉर्क पोस्टनुसार, अभ्यासकांनी सांगितलं की, अशी शक्यता आहे की, पश्चिम यूरोपमध्ये पाषाण युगातील पुरूष आणि महिलांनी धार्मिक कारणांसाठी आपली बोटं कापली होती. याचे पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलं. असं सांगण्यात आलं की, गुहांमध्ये अशा शेकडो पेंटिंग आढळल्या ज्यात हातांचा कमीत कमी एक भाग गायब होता.
कॅनडाच्या वेंक्यूअरमध्ये सायमन फ्रेजर यूनिवर्सिटीतील प्रोफेसर मार्क कोलार्ड यांनी द गार्डियनला सांगितलं की, या गोष्टीचे ठोस पुरावे आहेत की, या लोकांनी देवी-देवतांकडून मदत मागण्याच्या उद्देशाने आपली बोटं कापली होती.
कोलार्ड यांनी नुकतेच आपल्या स्टडीबाबतचे पेपर सादर केले. ज्यात फ्रान्स आणि स्पेनमध्ये 25 हजार वर्षाआधी हाताने बनवलेल्या चित्रांबाबत सांगण्यात आलंय. 200 प्रिंटपैकी प्रत्येकात कमीत कमी एक बोट गायब होतं. तर काही पेंटिंगमध्ये हाताचे अनेक बोटं गायब होती.
त्यांच्या या गोष्टी 2018 च्या एका स्टडीमध्ये प्रकाशित करण्यात आल्या होत्या. ज्यात सांगण्यात आलं की, देवतांना खूश करण्यासाठी लोक मुद्दामहून आपल्या शरीराचे अवयव कापत होते. ते म्हणाले की, असं दुसऱ्या इतर प्राचीन समाजांमध्येही होत होतं आणि आजही होतं. ते म्हणाले की, न्यू गिनी हायलॅंड्समधील महिला आजही जवळच्या कुणाचं निधन झालं तर संकेत म्हणून आपली बोटं कापतात.