भारतातील एक असं गाव जिथे चप्पल-शूज घालत नाही लोक, हॉस्पिटलमध्येही जात नाहीत; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 05:37 PM2023-05-24T17:37:01+5:302023-05-24T17:37:20+5:30
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लोकांना कुठे दूर जायचं असेल तरीही ते चपप्ल घालत नाहीत. हे गाव देशातील इतर गावांपेक्षा फार वेगळं आहे. या गावाचं नाव आहे वेमना इंदलू.
आजच्या काळात चप्पल आणि हॉस्पिटलशिवाय कुणीही दूर राहू शकत नाही. पण भारतात आजही एक गाव असं आहे जेथील लोक ना चप्पल घालत ना कधी हॉस्पिटलमध्ये जात. हैराण करणारी बाब म्हणजे या गावात एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला किंवा खासदार-आमदाराला यायचं असेल तर त्यांनाही चप्पल गावाबाहेर काढावी लागते. तेच या गावातील लोक गावात असो वा गावाबाहेर ते विना चप्पलच असतात.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लोकांना कुठे दूर जायचं असेल तरीही ते चपप्ल घालत नाहीत. हे गाव देशातील इतर गावांपेक्षा फार वेगळं आहे. या गावाचं नाव आहे वेमना इंदलू. आंध्र प्रदेशच्या तिरूपतीपासून हे गाव 50 किलोमीटर दूर आहे. एका रिपोर्टनुसार, या गावाच्या सरपंचांनी सांगितलं की, जेव्हापासून हे लोक गावात वसले, तेव्हापासून ही परंपरा आहे की, गावात जर कुणी आलं तर आंघोळ केल्याशिवाय येऊ नये.
तिरूपती जिल्ह्याच्या पाटला मंडलच्या या छोट्याशा गावात 25 परिवार राहतात. गावातील एकूण लोकसंख्या 80 आहे. जास्तीत जास्त लोक शिकलेले नाहीत आणि शेतीवर अवलंबून आहेत. गावातील नियमांचं पालन गावातील लोकांच्या नातेवाईकांना देखील करावं लागतं. रिपोर्टनुसार, स्वत:ला पलवेकरी जातीचे सांगतात.
गावातील लोक भगवान वेंकटेश्वरची पूजा करण्यासाठी तिरूमाला इथेही जात नाही. ते गावातच त्यांची पूजा करतात. गावातील लोक म्हणतात की, ते कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जात नाही. कारण त्यांना विश्वास आहे की, देवच सगळं ठीक करेल. लोक कडूलिंबाच्या झाडाची परिक्रमा करतात. पण हॉस्पिटलमध्ये जात नाहीत.
गावातील महिला सांगतात की, ते लोक घरीच सगळंकाही करतात. गर्भवती महिलेला सुद्धा ते हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत. ना कुणाला बाहेरून येऊ देतात. शाळेत जाणारी मुलं दुपारी जेवणासाठी घरी येतात. ते शाळेतील अन्न खात नाहीत. जेवण करून पुन्हा शाळेत जातात.
मासिक पाळी आली तर महिलांना घराच्याच नाही तर गावाच्या बाहेर रहावं लागतं. त्यांच्यासाठी गावाबाहेर एक रूम बांधण्यात आली आहे. गावातील लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो. त्यांच्या घरी धान्य पोहोचवलं जातं. जिल्हाधिकारी म्हणाले की, गावातील लोकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जागरूकता शिबीर चालवावं लागेल.