माणसाने हातात पकडला १३ फूट लांब विषारी किंग कोब्रा, पाहुनच तुमचा होईल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 07:57 PM2022-05-10T19:57:52+5:302022-05-10T20:00:01+5:30

जो तब्बल १३ फूट लांब आहे. हा साप साधसुधा नाही, तर खतरनाक विषारी असा किंग कोब्रा आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात हा साप घुसला. त्यानंतर एका व्यक्तीने हातानेच या सापाला पकडलं आहे.

Andhra snake catcher rescues 13 foot king cobra that entered palm oil plantation | माणसाने हातात पकडला १३ फूट लांब विषारी किंग कोब्रा, पाहुनच तुमचा होईल थरकाप

माणसाने हातात पकडला १३ फूट लांब विषारी किंग कोब्रा, पाहुनच तुमचा होईल थरकाप

Next

 म्हटलं तरी अंगाला घाम फुटतो. साप समोर आला की तोंडातून शब्द फुटत नाही. साधे छोटे छोटे साप पाहिले तरी भीती वाटते. पण सध्या अशा सापाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो तब्बल १३ फूट लांब आहे. हा साप साधसुधा नाही, तर खतरनाक विषारी असा किंग कोब्रा आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात हा साप घुसला. त्यानंतर एका व्यक्तीने हातानेच या सापाला पकडलं आहे (King cobra snake).

आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) एका व्यक्तीने तब्बल १३ फूट लांब किंग कोब्रा (King Cobra)  पकडला आहे. एका शेतकऱ्याच्या ताड तेलाच्या बागेत हा हा भयंकर साप घुसला होता. शेतकऱ्याने ईस्टर्न घाट वाइल्डलाइफ सोसायटीला संपर्क केला. त्यानंतर या इतक्या मोठ्या सापाला पकडण्यात आलं.

डीडी न्यूज आंध्रने या सापाचा फोटो सोशल मीडियावर ट्विट केला आहे. ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार सैदाराव नावाच्या शेतकऱ्याच्या बागेत हा १३ फूट लांब किंब कोब्रा घुसला. ईस्टर्न घाट वाइल्डलाइफ सोसायटीला याची माहिती देण्यात आली. तिथून व्यंकटेश नावाची साप पकडणारी व्यक्ती तिथं आली. व्यंकटनेशनने हातानेच साप पकडला.

या इतक्या मोठ्या सापाला पकडून एका गोणीत टाकण्यात आलं. त्यानंतर त्याला वंतलामिडी वनक्षेत्रात सोडण्यात आलं. रिपोर्टनुसार ही पहिलीच घटना नाही. गेल्या काही वर्षांपासून इथं असे विषारी साप मानवी वस्तीत दिसून येतात.

Web Title: Andhra snake catcher rescues 13 foot king cobra that entered palm oil plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.