जेव्हा हत्तीला येतो राग; 500 किलोच्या म्हशीला उचलून फेकलं हवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 03:13 PM2021-09-03T15:13:08+5:302021-09-03T15:13:28+5:30
Elephant and buffalo viral photo: मिळालेल्या माहितीनुसार, केनियामधील राष्ट्रीय उद्यानातला हा फोटो आहे.
हत्ती हा असाच एक प्राणी आहे, जो माणसांच्या अगदी जवळचा आहे. अनेकदा हत्ती आणि माणसांच्या मैत्री आणि जिव्हाळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हत्तीला इतर प्राण्यांपेक्षा खूप हुशार समजले जाते. पण, हत्तीला कधीही त्रास होऊ नये याची नेहमी काळजी घ्यावी लागते. कारण, जर हत्तीला राग आला, तर त्याचा राग शांत करणे सोपं नसतं. सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक फोटो व्हायरल होतोय.
Elephant spears a half ton buffalo.#Tiredearthpic.twitter.com/XFMI9X3O0h
— Green Planet (@Elizabeth_Ruler) September 1, 2021
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या चित्रात तुम्ही पाहू शकता की, एक मोठा हत्ती एका म्हशीला आपल्या सोंडेनं हवेत उडव. आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या म्हशीचे वजन 500 किलोपेक्षा जास्त होते. हा फोटो केनियामध्ये मासाई मारा गेम रिझर्व्हमधील असल्याची माहिती आहे.
हत्तीने असे का केले ?
मिळालेल्या माहितीनुसार, ही म्हैस त्या हत्तीच्या पिलाला त्रास देत होती. हत्तीच्या पिलावर हल्ला करणार, तेवढ्यात रागात आलेल्या हत्तीने म्हशीवर हल्ला केला. हत्तीने आपल्या सोडेंन इतका जोरदार हल्ला केला की म्हैस हवेत उडाली. यावेळी बघ्यांनी हे दृष्य आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर केले.