पत्नीने भांडणादरम्यान सांगितलं असं काही, पतीने केली डीएनए टेस्ट आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 09:12 AM2023-10-06T09:12:00+5:302023-10-06T09:12:11+5:30
एका रात्री भांडणादरम्यान पत्नीने माझ्या मुलीबाबत सांगितलं की, तिचा पिता मी नाही तर दुसरं कुणीतरी आहे.
पती-पत्नीच्या भांडणात अनेकदा लोक रागाच्या भरात असं काही बोलून टाकतात ज्यामुळे संसारही मोडण्याची वेळ येते. अनेकदा लोक अशा काही गोष्टी बोलून टाकतात ज्या त्यांनी अनेक वर्षापासून लपवलेल्या असतात. एका व्यक्तीने रेडिटवर त्याच्या जीवनातील अशाच एका घटनेबाबत सांगितलं.
त्याने सांगितलं की, एका रात्री भांडणादरम्यान पत्नीने माझ्या मुलीबाबत सांगितलं की, तिचा पिता मी नाही तर दुसरं कुणीतरी आहे. हे ऐकून मी हैराण झालो आणि ती गोष्ट माझ्या डोक्यात सतत सुरू होती. त्याने पुढे सांगितलं की, मी डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मला समजावं की माझी मुलगी माझी आहे की नाही.
त्याने सांगितलं की, त्याने बाहेर जाऊन घरी एक डीएनए किट आणली. टेस्ट केल्यावर 48 तासांनंतर त्याला रिझल्ट मिळाला. ज्यातून त्याला दिलासा मिळाला. मुलगी त्याचीच असल्याचं त्यातून दिसलं. म्हणजे पत्नीने त्याला खोटं सांगितलं होतं. पण पत्नीचं तसं बोलणं अजूनही त्याच्या डोक्यात फिरत होतं.
अशात त्याने पत्नीसोबत खोटं बोलण्याचा निर्णय घेतला आणि त्याने तिला सांगितलं की, त्याने डीएनए टेस्ट केली व त्यातून समजलं की, तो मुलीचा पिता नाही. हे ऐकताच पत्नी घाबरली आणि त्यानंतर तिने जे कबूल केलं ते हैराण करणारं होतं. तिने सांगितलं की, ती पतीच्याच एका जुन्या मित्रासोबत नात्यात होती. त्यामुळे तिला वाटतं की, मुलगी त्याची आहे.
त्याने पुढे लिहिलं की, जेव्हा माझ्या पत्नीने मला सांगितलं की, ती माझ्यापासून काही काळासाठी वेगळी झाली होती तेव्हा मी दुसऱ्या महिलांना डेट करत असल्याचं तिला समजलं होतं. याच रागातून तिनेही माझ्या मित्रासोबत संबंध ठेवले होते. नंतर वाद मिटले होते आणि त्यानंतर आम्हाला एक मुलगी झाली. अशात तिला वाटत होतं की, मुलगी पतीच्या मित्राची आहे.
त्याने पुढे लिहिलं की, पत्नीने सगळं काही सांगितल्यावर मी तिला डीएनए टेस्टचं सत्य सांगितलं. नंतर बराचवेळ ती मला मिठी मारून रडत राहिली आणि माफी मागत होती. पण तिने जे केलं त्यासाठी मी तिला कधीच माफ करू शकत नाही. हे नातं आता संपलं आहे. या व्यक्तीच्या पोस्टवर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.