या प्राण्याच्या दुधात असतं बीअर-व्हिस्कीपेक्षाही जास्त अल्कोहोल, दोन घोट घेऊन व्हाल टल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:18 AM2023-05-29T10:18:00+5:302023-05-29T10:19:39+5:30
Alcohol in Milk : जर या प्राण्याचं दूध तुम्हाला दिलं गेलं तर तुम्ही टल्ली होऊन पडून रहाल. चला जाणून घेऊ कोणता आहे तो प्राणी आणि त्याच्या दुधात इतकं अल्कोहोल का असतं याचं कारण...
Alcohal In Milk: दूध एक पौष्टिक आहार मानला जातो. ज्याने लोकांचं आरोग्य चांगलं आणि शरीराला पोषण मिळतं. जास्तीत जास्त लोक गाय, म्हैस आणि बकरीच्या दुधाचा वापर करतात. ज्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतात. पण एक असाही प्राणी आहे ज्याच्या दुधात अल्कोहोल असतं. इतकं अल्कोहोल की, बीअर आणि व्हिस्कीपेक्षाही जास्त नशा येईल. जर या प्राण्याचं दूध तुम्हाला दिलं गेलं तर तुम्ही टल्ली होऊन पडून रहाल. चला जाणून घेऊ कोणता आहे तो प्राणी आणि त्याच्या दुधात इतकं अल्कोहोल का असतं याचं कारण...
दूध हे जगभरातील लोकांच्या आहारातील महत्वाचा भाग आहे. दुधाने शरीराला पोषक तत्व मिळतात आणि व्यक्ती निरोगी राहतात. जे नियमित दूध पितात ते सामान्यपणे म्हैस किंवा गायीचं दूध पितात. जर कुणी आजारी असेल तर अनेकदा बकरीचं दूधही दिलं जातं. बकरीचं दूध आजही ग्रामीण भागात अधिक वापरलं जातं. बकरीच्या दुधात भरपूर प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतात. पण एक असा प्राणी आहे ज्याच्या दुधात भरपूर अल्कोहोल असतं. हा प्राणी आहे हत्तीण. तुमचा विश्वास बसणार नाही की, हत्तीणीच्या दुधात जवळपास 60 टक्के अल्कोहोल असतं.
काय आहे याचं कारण?
वैज्ञानिकांना रिसर्चमध्ये आढळून आलं की, हत्तीला ऊस खाणं फार पसंत असतं. ज्याद्वारे अल्कोहोल तयार केलं जातं. त्यामुळेच हत्तीणीच्या दुधात हे जास्त प्रमाणात अल्कोहोल आढळून येतं. पण मनुष्यांसाठी हत्तीणीची दूध उपयोगी नाही. या दुधात आढळणारे केमिकल्स मनुष्यासाठी घातक ठरू शकतात.
या दुधात बीटा कॅसीन असतं, ज्यामुळे दुधात हाय लेव्हलचं लॅक्टोज असतं. रिसर्चनुसार, आफ्रिकन हत्तीणीमध्ये लॅक्टोज आणि ओलिगोसेकेराइड्सची लेव्हल खूप हाय असते. हत्ती दिवसातून 12 ते 18 तास गवत, झाडांची पाने आणि फळं खाण्यात घालवतात. कारण त्यांना दररोज साधारण 150 किलो आहाराची गरज असते.