रेस्क्यु करायला गेले हंस पण समोरचे चित्र पाहताच बसला धक्का, अशी वस्तू सापडली की...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 07:10 PM2022-01-25T19:10:14+5:302022-01-25T19:27:28+5:30
स्टाउट बर्स्ट नदीमध्ये लोकांना एक हंस बुडताना दिसला. हा हंस विजेच्या तारेमध्ये अडकला आहे, असं अनेकांना वाटलं. हे पाहून लगेचच अॅनिमल चॅरिटीला फोन करून बोलावण्यात आलं. त्यांनीही नदीत बुडणाऱ्या हंसाला वाचवण्यासाठी मोहिम सुरू केली. मात्र, जवळून पाहिलं असता त्यांना धक्काच बसला.
अॅनिमल रेस्क्यू टीमचं (Animal Rescue Team) काम असतं, अडचणीत अडकलेल्या प्राण्यांची मदत करणं. एखादा प्राणी जर अडचणीत असेल किंवा एखाद्या अशा ठिकाणी अडकला असेल, जिथून त्याला स्वतःला बाहेर काढणं शक्य होत नाहीये, तेव्हा रेस्क्यू टीम मदतीसाठी पोहोचते. मात्र, अनेकदा या टीमचे काही गैरसमज होतात आणि ते अजब स्थितीमध्ये (Weird Situation) अडकतात. २०२१ साल हे इंग्लंडच्या रेस्क्यू टीमसाठी अतिशय व्यग्र होतं. मागील वर्षी टीमने तब्बल २ लाख ८१ हजार ३९० प्राण्यांना रेस्क्यू केलं. मात्र, यादरम्यान अशाही काही घटना घडल्या, ज्यामुळे त्यांची मस्करी केली गेली.
डोरसेट इथेही अशीच एक घटना समोर आली. इथे स्टाउट बर्स्ट नदीमध्ये लोकांना एक हंस बुडताना दिसला. हा हंस विजेच्या तारेमध्ये अडकला आहे, असं अनेकांना वाटलं. हे पाहून लगेचच अॅनिमल चॅरिटीला फोन करून बोलावण्यात आलं. त्यांनीही नदीत बुडणाऱ्या हंसाला वाचवण्यासाठी मोहिम सुरू केली. मात्र, जवळून पाहिलं असता हा हंस नसून प्लास्टिकची पांढऱ्या रंगाची खुर्ची असल्याचं लक्षात आलं.
नदीमध्ये तरंगणाऱ्या या पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक खुर्चीवर सगळ्यात आधी जवळून जात असलेल्या एका व्यक्तीची नजर पडली. हे पाहताच त्याने लगेचच रेस्क्यू टीमला फोन केला. टीमही लगेचच तिथे पोहोचली. पक्ष्याला वाचवण्यासाठी त्यांनी लगेचच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. दोरी मागवली गेली आणि एक व्यक्ती नदीत उतरण्यासाठी तयारही झाला. मात्र, इतक्यात टीममध्ये एका अधिकाऱ्याने पक्षाला जवळून पाहण्यासाठी त्याचा फोटो काढला. यानंतर त्यांना समजलं की पाण्यात हंस नसून प्लॅस्टिकची खुर्ची आहे.