April Fool's Day 2019 : असा साजरा करतात जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये 'एप्रिल फूल डे'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 03:39 PM2019-03-31T15:39:29+5:302019-03-31T15:40:16+5:30

1 एप्रिल हा वर्षातील असा एक दिवस असतो त्या दिवशी जगभरात लोक एमेकांना मुर्ख बनवण्यासाठी विविध शक्कल लढवून त्यांची फजिती करतात. त्यानंतर एप्रिल फूल असं म्हणतात.

April fools day 2019 all you need to know about foolish day history facts and origin | April Fool's Day 2019 : असा साजरा करतात जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये 'एप्रिल फूल डे'

April Fool's Day 2019 : असा साजरा करतात जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये 'एप्रिल फूल डे'

(Image Credit : Inc42)

1 एप्रिल हा वर्षातील असा एक दिवस असतो त्या दिवशी जगभरात लोक एमेकांना मुर्ख बनवण्यासाठी विविध शक्कल लढवून त्यांची फजिती करतात. त्यानंतर एप्रिल फूल असं म्हणतात. उगाच एखाद्याच्या खोड्या काढण किंवा फनी प्रॅन्क आणि जोक्स पाठवून सर्वांना हसवण्याचा प्रयत्न करतात. खरं तर या दिवसाची सुरूवात कशी झाली याबाबत सांगणं कठिण आहे. पण हा दिवस फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. फक्त हा दिवस साजरा करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जाणून घेऊया कोणत्या देशांमध्ये कशा प्रकारे एप्रिल फूल साजरा केला जातो त्याबाबत...

Image result for april full special gif

अमेरिका

यूनायटेड स्टेट्समध्ये संपूर्ण दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात येतो. रेडिओवरून खोट्या आणि हसवणाऱ्या आणि वेगवेगळ्या घाबरवाऱ्या गोष्टींचा वापर लोकांना एप्रिल फूल करण्यासाठी करण्यात येतो. मित्रांपासून नातेवाईक, ऑफिस मेंबर्स कोणीही यापासून आपला बचाव करू शकत नाही. या दिवसासाठी लोक फार एक्साइटेड असतात. 

ब्रिटन

ब्रिटनमध्ये एप्रिल फूल डेची एक्साइटमेंट फक्त अर्धा दिवसच असते. सकाळी सगळीकडे मस्तीचं वातावरण असतं पण दुपारी हे सर्व शांत होतं. जर तुम्ही या दिवसाचा आनंद घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात सकाळी लवकर करावी लागते. 

स्वीडन

स्वीडनमध्ये एकमेकांशी खोटं बोलून किंवा मुर्ख बनवूनच हा दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. येथे जर तुम्ही कोणाला मूर्ख बनवू शकलात तर जोर-जोरात 'April, April, Din dumma sill, jag kan lura dig vart jag vill!' असं म्हणावं लागतं. 

स्कॉटलँन्ड 

स्कॉटलँन्डमध्ये मूर्ख माणसांना (Gowk) असं म्हटलं जातं. येथे 1 एप्रिलला फूल डे नाही तर हंट आणि गाउक डे म्हणून ओळखलं जात असून हा दिवस दोन दिवसांसाठी साजरा करण्यात येतो. पहिल्या दिवशी एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतींनी मूर्ख करण्यात येतं आणि दुसऱ्या दिवशी Tailie Day साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकं एकमेकांना शेपट्या लावतात. 

इटली

इटलीमध्ये एप्रिल फूल वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा करण्याती प्रथा आहे. येथे एक दिवस एकमेकांच्या पाठीमागे पेपर फिश चिटकवतात. तसं पाहायला गेलं तर अनेक लहान मुलं यामध्ये सहभागी होतात. पण त्यांच्यासोबत अनेक वृद्ध माणसंही असतात. 

भारत

भारतामध्ये एप्रिल फूल हा ट्रेन्ड बाहेरील देशांमधून आला आहे. त्यामुळे एकमेकांना मूर्ख बनवूनचं हा दिवस साजरा करण्यात येतो. मूर्ख बनवल्यानंतर 'एप्रिल फूल-एप्रिल फूल असं बोललं जातं. खोटे इंटरव्यू कॉल, जेवणाचा रिकामा डब्बा यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. 

ग्रीस

ग्रीसमध्ये एप्रिल फूल प्रॅन्कला गुड लकशी जोडून पाहिलं जातं. असं मानलं जातं की, जर तुम्ही एकाद्या व्यक्तीसोबत प्रँक करणार असाल तर त्यामुळे तुम्हाला येणारं वर्ष हे अत्यंत आनंदात जाणारं असेल. 

फ्रान्स 

इटलीप्रमाणे फ्रान्समध्येही एकमेकांच्या पाठिवर पेपर फिश चिटकवून गंमत केली जाते. ज्या पाठिवर पेपर फिश लावण्यात येतं त्याला समजल्यावर चिटकवणाऱ्याला 'एप्रिल फिश' असं म्हटलं जातं. 
 

Web Title: April fools day 2019 all you need to know about foolish day history facts and origin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.