April Fool's Day 2019 : एप्रिल फूल बनवण्यासाठी काही खास आयडियाच्या कल्पना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 09:49 AM2019-04-01T09:49:33+5:302019-04-01T09:56:17+5:30

जगभरातील माणसे आजच्या दिवशी एकमेकांची गंमत करतात, जोक्स पाठवतात, लबाडी करून मित्र -मैत्रिणींना फसवण्याचा आनंदही लुटतात.

April Fool's Day 2019: How to make April fool to your friends | April Fool's Day 2019 : एप्रिल फूल बनवण्यासाठी काही खास आयडियाच्या कल्पना!

April Fool's Day 2019 : एप्रिल फूल बनवण्यासाठी काही खास आयडियाच्या कल्पना!

Next

जगभरातील माणसे आजच्या दिवशी एकमेकांची गंमत करतात, जोक्स पाठवतात, लबाडी करून मित्र -मैत्रिणींना फसवण्याचा आनंदही लुटतात. हा जरी सुटीचा दिवस नसला तरी या दिवशी सुटीची मजा घेतात. एप्रिल महिन्याची पहिली तारीख ही एकमेकांना मूर्ख बनवण्याची म्हणून एप्रिल फूल. या दिवसाची सुरूवात कशी झाली याबाबत अनेक वाद आहेत. अनेकांनी अनेक कारणे दिली आहेत. ते काही असो पण शाळा, कॉलेज जीवनात मित्र-मैत्रीणींना एप्रिल फूल बनवण्यासाठी अनेक उद्योग केले जातात. शाळांमध्ये तर हे खूप जास्त प्रमाण असतं. ‘जा तुला मॅडम ने बोलवलं आहे’, असं मित्र सांगतात आणि तिकडे जाऊन बघितलं तर मॅडम म्हणतात नालायका मी कशाला बोलवलं तुला’ असे एक ना अनेक किस्से प्रत्येकाच्याच जीवनात घडतात.

१४ व्या शतकातील अनेक प्रसिद्ध लेखकांनी एप्रिल फूलच्या दिवसाचा उल्लेख केलेला आढळतो. पर्शियन नवीन वर्षाच्या १३ व्या दिवशी इराणी लोक एकमेकांना विनोद, गमतीदार किस्से पाठवतात व हा दिवस एप्रिलची १ किंवा २ तारीख असतो. फ्रान्समधील लोक हा दिवस ‘एप्रिल फिश’ म्हणून साजरा करतात. या दिवशी एकमेकांना कळू न देता एकमेकांच्या पाठीवर कागदाचे मासे चिकटवतात व धमाल करतात. बेल्जियममध्ये हा दिवस मुलांचा असतो. तर असा हा मुर्ख बनवण्याचा दिवस साजरा केला जातो. आम्ही तुमच्यासाठी मुर्ख बनवण्याच्या काही खास टीप्स घेऊन आलो आहोत. बघा जमतंय का ते…

* तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला त्याला आवडत असलेल्या मुलीच्या नावाने फोन करून….त्याच्याशी छान छान गप्पा करू शकता. त्याला तुम्ही प्रपोजही करू शकता. पण ही गंमत इतकीही करू नका की कुणाच्या जीवावर बेतेल.

* एखाद्या मित्राला तुम्ही सांगू शकता की, त्या अमक्या अमक्या चौकात मी तुझी वाट बघतोय लगेच इथे ये…मी या दुकानाजवळ उभा आहे. हे तुम्ही त्याला घरून फोन लावून सांगू शकता.

* ऑफीसमधील मित्रांना फोन करून तुम्ही सांगू शकता की, आज ऑफीसमध्ये लाईट नसल्या कारणाने ऑफीसला सुट्टी दिली आहे. आज कुणीही येणार नाही. हे करा पण जास्त उशिर होण्याआधी त्याला सत्यही सांगा, नाहीतर त्याचा पगार कापला जाईल.

* सॅलरी झाली नसेल तर ऑफीसमधीलच मित्र सकाळी ऑफीसला आला की, त्याला सांगा अरे भाई सॅलरी झाली…आणि त्याला त्याच्या मोबाईलमध्ये एसएमएस चेक करायला सांगा…? तो बघेल आणि त्याला एसएमएस आलेला नसेल…त्याला एचआरकडे जाऊन विचारपूस करायला सांगू शकता.

* मैत्रिणीला मुर्ख बनवण्यासाठी तिला सांगा की, अमका अमका मुलगा तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण त्याने कधीही तुला सांगितले नाही. आज आम्हाला हे कळाले. पण तू त्या मुलाला काही बोलू नको. बघा ती काय करते….

* ऑफीसमधील मित्राचा कि-बोर्ड गायब करा आणि चोरीला गेला सांगा.

* एखाद्या मित्राच्यी टी-शर्टवर किंवा शर्टवर मागे हळूच एप्रिल फूलचं स्टीकर लावा आणि कुठेतरी फिरायला घेऊन जा. 

असे एक ना अनेकप्रकारे तुम्ही गंमत करू शकता. पण ही गंमत कुणाला महागात पडू नये याची काळजीही घ्या. कारण हा दिवस गंमत करण्याचा आहे, कुणाचं मन दुखवण्याचा किंवा भांडण करण्याचा नाहीये.

 

Web Title: April Fool's Day 2019: How to make April fool to your friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.