अहो आश्चर्यम! खोदलं तर जमिनीखाली होती 20 घरं; सापडला हजार वर्षांपूर्वींचा मौल्यवान खजिना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 03:04 PM2022-11-02T15:04:43+5:302022-11-02T15:05:40+5:30
पुरातत्व विभागाचे अधिकारी 20 हून अधिक प्राचीन घरात खोदकाम करत असताना त्यांना हा अनमोल खजिना सापडला आहे.
सुडानची राजधानी स्टॉकहोममध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जवळपास एक हजार वर्षांपूर्वीचा अनमोल खजिना सापडला आहे. यामध्ये चांदीच्या दागिन्यासह अनेक मौल्यवान वस्तू आहेत. पुरातत्व विभागाचे अधिकारी 20 हून अधिक प्राचीन घरात खोदकाम करत असताना त्यांना हा अनमोल खजिना सापडला आहे. हा खजिना जेव्हा जमिनीतून बाहेर काढला तेव्हा एक हजार वर्ष प्राचीन असलेल्या त्या दागिन्यांवर नवीन दागिन्यांसारखी चमक होती, असं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
स्टॉकहोम येथील टेबीमध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना हा अनमोल खजिना सापडला आहे. या परिसरात अधिकाऱ्यांना 20 घरे आणि इमारतींचे अवशेष सापडले होते. त्यातीलच एका इमारतीच्या खाली खजिन्याचा शोध लागला आहे. अधिकाऱ्यांनी जेव्हा तिथे पाहणी केली खजिना सापडलेली जागा अत्यंत खराब झाली होती. मात्र जमिनीखाली गाडलेला खजिना मात्र व्यवस्थित होता.
अधिकाऱ्यांना सापडलेल्या खजिन्यामध्ये जवळपास 8 नेक रिंग, बाजूबंद, एक अंगठी, दोन माळा आणि 12 नाणी सापडली आहेत. त्यातील 12 नाण्यांचा उपयोग पेंडेट म्हणूनही वापरता येऊ शकतो. हे सारे दागिने एका मातीच्या भांड्यात ठेवण्यात आले होते. यातील बरीचसे दागिने हे सुस्थित असून अगदी नवीन असल्यासारखे चमकत आहेत. पुरातत्व विभागाला पुढील तपासासाठी याचा फायदा होणार आहे.
पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खजिन्यामध्ये असलेली नाणी ही वायकिंगच्या काळातील असल्याचं स्पष्ट होतं आहे. त्याकाळी होत असलेल्या व्यापारादरम्यान असंच चलन वापरात होते. विशेष म्हणजे, या नाण्याचा उपयोग इंग्लंडसह अनेक देशात केला जात होता. तसंच, काही अशीही नाणी सापडली आहेत ज्याचा उपयोग अरब देशांमध्येही होत होता. अशा प्रकारची नाणी 18 व्या शतकातील एका जुन्या पुस्तकात पाहायला मिळतात, अशी माहिती स्टॉकहोम विद्यापीठाच्या प्रोफेसर Jens Christian Moesgaard यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.