पार्कमध्ये खोदकाम करताना आला अजब आवाज, उघडून पाहिलं तर सापडला मोठा खजिना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:06 PM2024-03-09T13:06:01+5:302024-03-09T13:07:05+5:30
एका पार्कमध्ये खोदकाम करताना अजब आवाज आला. आधी तर लोक घाबरले. पण नंतर आत सापडलेला खजिना पाहून आनंदाने नाचू लागले.
पृथ्वीच्या आत काय काय लपलं आहे याची कुणीही कल्पना करू शकत नाही. काही दिवसांआधी गुजरातच्या एका गावात खोदाकामादरम्यान खजिना सापडला होता. जो बघून सगळेच अवाक् झाले होते. असंच काहीसं पनामामध्ये झालं आहे. इथे एका पार्कमध्ये खोदकाम करताना अजब आवाज आला. आधी तर लोक घाबरले. पण नंतर आत सापडलेला खजिना पाहून आनंदाने नाचू लागले.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, पनामाच्या सांस्कृतीक मंत्रालयाने सांगितलं की, कोकले प्रांतातील के एल कानो पुरातत्व पार्कमध्ये काही लोक खोदकाम करत होते. तेव्हा त्यांना एक कबर मिळाली. ऐतिहासिक पुराव्यावरून समजलं की, ही कबर 750 आणि 800 ईसवी सन पूर्वची आहे. तेव्हा याच्या मालकाने ही कबर खास पद्धतीने तयार केली होती.
कबरेच्या आत सोन्याचा खजिना लपला होता. सोन्याच्या अनेक गोलाकार प्लेट्स, सोन्याच्या मण्यांपासून तयार दोन बेल्ट्स, चार बांगड्या, दोन घंटी आणि हाडांच्या बासरीसोबतच इतरही वस्तू सापडल्या. त्याशिवाय कबरेत व्हेल माशापासून तयार सोन्याच्या थर लावलेले दागिनेही सापडले.
एक्सपर्टने सांगितलं की, चौकशीतून समजलं की, ही कबर एखाद्या अशा व्यक्तीची असू शकते जो परिवाराचा मुख्य असेल. त्याचा मृत्यू 30 वयात झाला असेल. खोदकामाचं नेतृत्व करणाऱ्या डॉ. ज्यूलिया मेयो म्हणाल्या की, इतरही अजूनही काही कबरी आम्हाला आढळल्या. पण त्यात केवळ मृतदेह होते. असं वाटतं की, त्यांना त्यांच्या मुख्य व्यक्तीसोबत दफन करण्यात आलं होतं.