Bronze sword excavated : शेतात सापडली ३००० वर्ष जुनी कांस्याची तलवार; अवस्था पाहून पुरात्व विभागही झाला चकीत....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:25 PM2021-03-15T19:25:02+5:302021-03-15T19:31:16+5:30
Archaeology news ornate prehistoric bronze sword : 'हा शोध खूप विशेष आहे कारण ही प्राचीन तलवार अत्यंत सुरक्षित अवस्थेत आढळली आहे. आम्ही 3000 वर्षांपूर्वीचा अनमोला ठेवा हाताळत आहोत.''
पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमधील एका शेतातून कांस्याची तलवार सापडली आहे. सुमारे 3000 वर्ष जुन्या असलेल्या या तलवारीची अवस्था पाहून पुरातत्वशास्त्रज्ञही आश्चर्यचकित आहेत. तलवारीतील लाकडी मुठ अद्यापही उत्तम स्थितीत आहे. ओडेंस सिटी म्युझियमचे मुख्य तपासनीस, जेस्पर हॅन्सेन म्हणाले की, ''हा शोध खूप विशेष आहे कारण ही प्राचीन तलवार अत्यंत सुरक्षित अवस्थेत आढळली आहे. आम्ही 3000 वर्षांपूर्वीचा अनमोला ठेवा हाताळत आहोत.''
असे सांगितले जात आहे की डेनमार्कचे तिसरे सर्वात मोठे बेट वेस्ट फॅनेनच्या खोदकामादरम्यान ही तलवार मिळाली. या तलवारीत कांस्य जोडण्यासाठी लाकडांचा वापर करण्यात आला आहे. ही तलवार अलंकृत असून ती एका प्रथेअंतर्गत पुरण्यात आल्याचा समज आहे. दफन करण्यापूर्वी ती गुंडाळली गेली आणि एका विशिष्ट पदार्थासह पुरली गेली.
या भागातून गॅस पाइपलाइन जाणार असल्याचे सांगण्यात येत असून, त्या दृष्टीने उत्खनन केले जात आहे. मागील वर्षी यापूर्वी, संग्रहालयाने 60 किमी क्षेत्राचे सर्वेक्षण केले. शेवटच्या भागात ही तलवार सापडली आहे. सुमारे 3 हजार वर्षे आधी पुरल्यानंतरही, या तलवारीची अनेक सेंद्रिय सामग्री अद्याप पूर्णपणे अबाधित आहे.Viral : ऑनड्यूटी स्तनपान करत होती महिला पोलिस; फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी मागितली माफी
तांबे आणि कांस्ये यांचे मिश्रण करून तलवार तयार करण्यात आली होती. त्यावेळी हा मोठा शोध होता आणि तलवार अधिक मजबूत बनवू शकते. सर्बियामध्ये 7 हजार वर्षांपूर्वी कांस्य असल्याचा पुरावा मिळाला आहे. असे म्हणतात की त्यावेळी मध्य युरोपमधून कांस्य आयात केले जात असे. सुमारे 6 हजार वर्षांपूर्वी या भागात शेती सुरू झाली होती. Video : कमाल! नियम मोडणाऱ्यांना लांबूनच असं ओळखतात ट्रॅफिक पोलिस; पाहा व्हायरल व्हिडीओ