चिंताजनक! आर्कटिकात फिरणारा प्राणी ४३०० किमी लांब बेटावर आढळला; वैज्ञानिकांचा धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 06:56 PM2021-03-16T18:56:10+5:302021-03-16T19:00:19+5:30
Arctic walrus reached irelands: मोठा बदल असून कोणताही जीव आपलं घर सोडून इतक्या लांब येतो ही धोक्याची सुचना असून पर्यावरणातील बदलांचा परिणाम आहे. असं वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
प्रत्येकालाच आपल्या घरापासून दूर राहणं आवडत नाही. पण पर्यावरणातील बदल आणि माणसांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे प्राण्यांना आपलं घर सोडावं लागतं. उत्तरी ध्रुवाच्या थंड प्रदेशातील आर्कटिक परिसरात आढळणारे प्राणी (Arctic walrus) ४३२५ किमी लांब बेटावर आले आहेत. यामुळेच पर्यावरण वैज्ञानिक चिंतेत आहेत. हा मोठा बदल असून कोणताही जीव आपलं घर सोडून इतक्या लांब येतो ही धोक्याची सुचना असून पर्यावरणातील बदलांचा परिणाम आहे. असं वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
An Arctic Walrus has landed on Valentia Island... believed to have made its way all the way from Greenland! It appears to be exhausted. Video by Alan Houlihan, who’s 5 year old daughter was the first to spot the walrus. #Kerrypic.twitter.com/TLtBLBAZDk
— Seán Mac an tSíthigh (@Buailtin) March 14, 2021
सोमवारी म्हणजेच १५ मार्चला एक स्थानिक व्यक्ती आणि त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीनं काऊंटी कॅली परिसरात एक वॉलरस पाहिले. हा प्राणी अनपेक्षितपणे दिसताच स्थानिक प्रशासनाला सुचना देण्यात आल्या. कारण बेटांवर वॉलरस दिसणं अतिशय दुर्मिळ घटना आहे. हा वॉलरस आर्कटिकवरून आल्याचं समोर येत आहे.
आर्कटिक या बेटापासून ४३०० किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार आयलँडच्या आसपास अश्या प्रकारचा कोणताही जीव आढळत नाही. त्यानंतर वैज्ञानिकांना सुचना देण्यात आल्या आहेत. वॉलरस अत्यंत दुर्मिळ ठिकाणी दिसत असून नवीन प्रजनन स्थानाच्या शोधात ते लांब येतात. Video : कमाल! नियम मोडणाऱ्यांना लांबूनच असं ओळखतात ट्रॅफिक पोलिस; पाहा व्हायरल व्हिडीओ
मरिन लाईफचे वरिष्ट तज्ज्ञ टॉम अर्नबोम यांच्या म्हणण्यानुसार हे पर्यावरण बदलाचे मोठे संकेत आहेत. तसेच हे प्राणी जास्तवेळ आपल्या समुहापासून वेगळे राहिले तर जीवंत राहू शकणार नाहीत. हे प्राणी आपला रस्ता स्वतःच शोधून पुन्हा परत जातात. उत्तर अटलांटिकमध्ये २० हजारांपेक्षा जास्त वॉलरस आहेत. पर्यावरणातील बदल, जहाजांच्या येण्यामुळे यांची घरं तुटली आहेत. जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्