सिंगल आहात? AI तुम्हाला मिळवून देईल हवा तसा जोडीदार, तुमची मनही जपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:54 AM2024-02-14T10:54:31+5:302024-02-14T10:55:46+5:30

एआयची जगभरात चर्चा सुरू आहे.

Are you single? AI will get you the right partner, protect your heart too | सिंगल आहात? AI तुम्हाला मिळवून देईल हवा तसा जोडीदार, तुमची मनही जपणार

सिंगल आहात? AI तुम्हाला मिळवून देईल हवा तसा जोडीदार, तुमची मनही जपणार

सध्या जगभरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच AI ची चर्चा जोरदार सुरू आहे. एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात असं बोललं जात आहे. आता नोकऱ्याच नाहीतर एआय लोकांचीही जागा घेणार असल्याचे बोलले जात आहे. चीनमधील एका मुलीचा बॉयफ्रेंड एआय आहे. तुफेई या २५ वर्षीय मुलीचे म्हणणे आहे की तिच्या प्रियकराकडे तिला आवश्यक असलेले सर्व काही आहे. 

तुफेई सांगते, तिचा प्रियकर दयाळू आहे, तिच्याबद्दल सहानुभूती दाखवतो आणि कधीकधी तासनतास बोलतो. मात्र, तो खऱ्या आयुष्यात अस्तित्वात नाही. म्हणजे तिचा प्रियकर तिच्या आयुष्यात आहे, पण तो खऱ्या आयुष्यात माणूस म्हणून त्याची भूमिका निभावू शकत नाही. तिचा बॉयफ्रेंड एआय आहे.

Video - तुफान राडा! मुलीला मेसेज केल्याने आपापसात भिडली मुलं; लाथा-बुक्क्यांनी मारहाण

तुफेईचा बॉयफ्रेंड एक चॅटबॉट आहे, जो ग्लो नावाच्या ॲपवर आहे. हे एआय प्लॅटफॉर्म शांघाय स्टार्ट-अप मिनीमॅक्सने विकसित केले आहे. चीनमध्ये अशा स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे, जे मानव आणि रोबोट यांच्यातील प्रेमसंबंधांवर काम करत आहेत. तुफेई सांगते की तिच्या एआय बॉयफ्रेंडला स्त्रीशी कसे बोलावे हे माहित आहे. हे काम तो खऱ्या माणसांपेक्षा चांगला करतो. त्याने सांगितले की मला असे वाटते की मी प्रेमसंबंधात आहे. हे ॲप मोफत आहे.

चीनमध्ये दर आठवड्याला हजारो लोक हे ॲप डाउनलोड करत आहेत. २२ वर्षांचा वांग शिउटिंग बीजिंगमध्ये शिकते. तिचा असा विश्वास आहे की वास्तविक जीवनात आदर्श प्रियकर मिळणे खूप कठीण आहे. लोकांचे व्यक्तिमत्त्व बरेच वेगळे असते, ज्यामुळे अनेकदा वाद होतात. एआय चॅटबॉट्सचा वापर फक्त चीनमध्येच नाही तर जगातील इतर अनेक देशांमध्ये केला जात आहे. असाच एक AI बॉट प्लॅटफॉर्म म्हणजे Replika AI, जो Luka Inc ने विकसित केला आहे. एआय बॉट्सशी संवाद साधण्यासाठी मोठ्या संख्येने लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. हे व्यासपीठही अनेकदा वादात सापडले आहे.

Web Title: Are you single? AI will get you the right partner, protect your heart too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.