मैत्रिणीच्या तरूण मुलासोबत वयोवृद्ध महिलेने केलं लग्न, हनीमूनला झाली दुर्घटना आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 04:59 PM2021-11-19T16:59:51+5:302021-11-19T17:00:23+5:30
सामान्यपणे कोणत्याही कपलमध्ये तीन ते चार वर्षांचा फरक योग्य मानला जातो. तेच या कपलमध्ये ६८ वर्षांचा गॅप होता. आम्ही तुम्हाला सांगतोय अर्जेंटिनामध्ये राहणाऱ्या ९१ वर्षीय महिलेबाबत.
प्रेम एक असं नातं आहे ज्याला जगातलं सर्वात चांगलं फिलिंग मानलं जातं. जेव्हा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडता, तेव्हा चूक आणि बरोबर काही फरक करता येत नाही. अनेक अनोख्या लव्हस्टोरी अलिकडे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी एक अशीच लव्हस्टोरी समोर आली, ज्याबाबत वाचल्यावर लोक हैराण झाले. या नात्यात ९१ वर्षीय एका महिलेने २३ वर्षीय तरूणासोबत लग्न केलं. पण हनीमूनला गेले असतान एक दुर्घटना घडली, ज्यानंतर जे झालं त्याने सर्वांना धक्का बसला.
सामान्यपणे कोणत्याही कपलमध्ये तीन ते चार वर्षांचा फरक योग्य मानला जातो. तेच या कपलमध्ये ६८ वर्षांचा गॅप होता. आम्ही तुम्हाला सांगतोय अर्जेंटिनामध्ये राहणाऱ्या ९१ वर्षीय महिलेबाबत. ही महिला तिच्या मैत्रिणीच्या घरात राहत होती. महिलेच्या मैत्रीणीच्या घरात तिचा २३ वर्षीय मुलगाही राहत होता. महिलेच्या मैत्रिणीची आर्थिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे वयोवृद्ध महिला तिच्या पेंशनमधून मैत्रिणीची मदत करत होती. पण यादरम्यान असं काही झालं की, ९१ वर्षीय महिलेने मैत्रिणीच्या मुलासोबत लग्न केलं.
हे लग्न काही प्रेमात पडून केलं गेलं नव्हतं. या लग्नामागे पैसे हे एक मुख्य कारण होतं. महिलेला आपल्या मैत्रिणीच्या मुलाची मदत तिच्या मृत्यूनंतरही करायची होती. महिलेला पेंशन मिळत होतं. ज्यातून ती तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत करत होती. पण तेच तिच्या मृत्यूनंतर ती हे करू शकली नसती. अशात महिलेने शक्कल लढवली. तिने मैत्रिणीच्या मुलाला लग्नासाठी विचारलं. जर दोघांनीही लग्न केलं असतं तर महिलेचं पेंशन तरूणाला मिळालं असतं. ज्याने त्याला आर्थिक मदत झाली असती. पण झालं उलटंच.
महिलेने मैत्रिणीच्या मुलासोबत लग्न केलं. यानंतर दोघे हनीमूनला गेले. पण तिथे एक दुर्घटना झाली. हनीमूनवरच महिलेचा मृत्यू झाला. जेव्हा तरूणाने महिलेच्या मृत्यूनंतर पेंशनसाठी क्लेम केला तर उलट पेंशन अधिकाऱ्यांनी त्याच्यावरच फसवणुकीचा आरोप केला. अधिकाऱ्यांनी त्याला पेंशनसाठी लग्न या आरोपात तुरूंगात पाठवण्याची तयारी केली. तरूणाला पेंशन तर मिळालं नाहीच उलट त्याला तुरूंगात जावं लागलं. नंतर अनेक प्रयत्न करून तरूणाला तुरूंगातून सोडवण्यात आलं.