23 वर्षांच्या तरुणाचं 91 वर्षीय काकीशी लग्न; आता केली अनोखी मागणी, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 02:20 PM2023-11-02T14:20:22+5:302023-11-02T14:28:46+5:30

योलांडाचे वय 90 पेक्षा जास्त असेल पण ती मनाने तरुण होती.

argentina man 23 claims married to 91 year old great aunt launches legal fight her pension | 23 वर्षांच्या तरुणाचं 91 वर्षीय काकीशी लग्न; आता केली अनोखी मागणी, म्हणाला...

फोटो - आजतक

साधारणपणे लोक दोन ते तीन वर्षे किंवा जास्तीत जास्त 5 वर्षांनी लहान किंवा मोठ्या व्यक्तीला जीवनसाथी म्हणून निवडतात. पण जगात अशा अनेक बातम्या समोर येतात ज्यात वयात मोठं अंतर असलेलं जोडपं एकमेकांशी लग्न करतात. त्यांच्यापैकी बहुतेक जण खरं प्रेमात असल्याचा दावा करतात आणि म्हणतात की त्यांच्या जोडीदाराच्या वयाने त्यांना काही फरक पडत नाही. पण कधी कधी अशा नात्यात कटू सत्य देखील असतं. अशीच एक संशयास्पद लग्नाची घटना अर्जेंटिनातून समोर आली आहे.

एक 23 वर्षीय वकील मॉरिसिओ त्यांची मृत्यू झालेली  91 वर्षीय काकी योलान्डा टोरिसच्या पेन्शनवर दावा करत आहे. तो म्हणतो की, त्याने फेब्रुवारी 2015 मध्ये त्याच्या 91 वर्षांच्या काकीशी लग्न केलं आणि एप्रिल 2016 मध्ये तिचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत त्याचा पेन्शनवर हक्क आहे. परंतु चौकशीत महिलेच्या शेजाऱ्यांनी हे लग्न खोटं असल्याचं घोषित केल्यावर प्रशासनाने त्याचा अर्ज फेटाळून लावला.

अर्जेंटिनातील साल्टा शहरातील मॉरिसिओ काकीसोबत राहत होता आणि 2016 मध्ये योलान्डाच्या मृत्यूनंतर, त्याने पेन्शनसाठी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न सुरू केला. दाव्याच्या आधारे तपास सुरू करण्यात आला, ज्यामध्ये अधिकाऱी कुटुंबाला ओळखत असलेल्या आणि शेजारच्या लोकांशी देखील बोलले. शेजाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना लग्नाबद्दल काहीही माहिती नाही. याचा परिणाम असा झाला की मॉरिसिओचा दावा फेटाळण्यात आला. 

मॉरिसिओ स्थानिक वृत्तपत्र एल ट्रिब्युनो डी साल्टाला सांगितलं की, "योलान्डा माझ्या आयुष्यातील एक मोठा आधार होती आणि माझ्याशी लग्न करणं ही तिची शेवटची इच्छा होती. मी योलान्डावर मनापासून प्रेम केलं. तिच्या मृत्यूचं मला आयुष्यभर दु:ख राहील. मी पेन्शनसाठी अर्ज करायला सुरुवात केली तेव्हा मी सर्व आवश्यक कागदपत्रे दाखवली, तरीही पेन्शन मिळण्यात अडचण आहे. योलांडाचे वय 90 पेक्षा जास्त असेल पण ती मनाने तरुण होती. आमच्या लग्नात कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये एवढीच तिची इच्छा होती." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: argentina man 23 claims married to 91 year old great aunt launches legal fight her pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.