आर्ट ऑफ लिव्हिंगने यमुना नुकसानप्रकरणी ५ कोटी भरावेत - राष्ट्रीय हरीत लवादाचा आदेश
By admin | Published: March 9, 2016 04:13 PM2016-03-09T16:13:20+5:302016-03-09T17:16:14+5:30
यमुना नदीला हानी पोचवल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगने ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी असा आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने दिला आहे
Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - यमुना नदीला हानी पोचवल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगने ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी असा आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने दिला आहे. मात्र हा दंड ठोठावतनाच त्यांना हा कार्यक्रम करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
या कार्यक्रमामुळे यमुना नदीला कोणतीही हानी पोचवली जाणार नाही याची हमी श्री श्री रवीशकंर यांनी दिली आहे. तरीही राष्ट्रीय हरीत लवादाने पाहमी केल्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगने ५ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी असे म्हटल्याचे वृत्त झी न्यूजने दिले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या कार्यक्रमासाठी 1000 एकर जमीन आणि यमुनेच्या काठाचा उपयोग करण्यात आला असून यामुळे निसर्गाची हानी होत असल्याचा आरोप होत आहे. नदीच्या प्रवाहामध्येही बदल करण्यात आला असून यामुळे नदीची अपरिमीत हानी झाल्याचाही दावा विरोधकांनी केला आहे.
तज्ज्ञांच्यामते या सगळ्या बदलांमुळे नदीलगतच्या जमिनीचेही नुकसान झाले आहे. अखेर, या जागेची सखोल पाहणी केल्यानंतर राष्ट्रीय हरीत लवादाने या परीसराचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत आर्ट ऑफ लिव्हिंगने ५ कोटी रुपये भरावेत असा आदेश दिला आहे.
जगभरातून या कार्यक्रमासाठी 30 लाख लोक येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामुळे यमुना नदी प्रदुषित होईल असाही आरोप आहे.