जगातला एकमेव आर्टिस्ट जो आपल्याच रक्ताने बनवतो पेंटिंग, वैज्ञानिकही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 09:35 AM2023-03-11T09:35:16+5:302023-03-11T09:39:30+5:30
जगात असे अनेक कलाकार आहेत ज्यांची कलाकारी पाहून लोक थक्क होतात. हे कलाकार अनोख्या पद्धतीने आपल्या कलेला सादर करतात, पण एक असा आर्टिस्ट आहे जो केवळ आपल्या रक्तानेच पेंटिंग बनवतो.
जगभरात अशा शेकडो पेंटिंग्स आहेत ज्यांची किंमत कोट्यावधी रूपये आहे. कधी कधी पेंटिंग्समधून जीवनाचं सत्य समोर येतं आणि त्यात खोलवर एखादा संदेशही असतो. पेंटिंग्ससाठी कलाकार सामान्यपणे रंग, माती, राख, फुलांचा वापर करतात. पण एक असा कलाकार आहे जो आपल्या पेंटिंग्समध्ये आपल्याचा रक्ताने रंग भरतो.
जगात असे अनेक कलाकार आहेत ज्यांची कलाकारी पाहून लोक थक्क होतात. हे कलाकार अनोख्या पद्धतीने आपल्या कलेला सादर करतात, पण एक असा आर्टिस्ट आहे जो केवळ आपल्या रक्तानेच पेंटिंग बनवतो. हा कदाचित जगातील एकुलता एक असा आर्टिस्ट असेल जो रक्ताने पेंटिंगमध्ये रंग भरतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा आर्टिस्ट रंगांनी नाही तर आपल्या रक्ताचे रंग बनवून पेंटिंग तयार करतो. या आर्टिस्टचं नाव आहे एलिटो सर्का आणि तो फिलिपीन्सचा राहणारा आहे. रॉयटर्सने त्याच्या काही पेंटिंग्स काही दिवसांआधी शेअर केल्या होत्या. हा कलाकार अनेक वर्षापासून पेंटिंग काढतो, एक दिवस त्याला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहत होतं. तेव्हा त्याला ही आयडिया आली.
तेव्हापासून त्याने रक्ताने पेंटिंग करणं सुरू केलं. हळूहळू याची चर्चा होऊ लागली. पण अनेकदा त्याच्यावर टीकाही झाली. तो दर तीन महिन्यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपलं रक्त काढतो.
एका तो 500 मिलीलीटर रक्त काढतो आणि आपल्या स्टुडिओतील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो. तो म्हणाला की, त्याची कला त्याच्यासाठी खास आहे, कारण ती त्याच्या रक्तातून आणि डीएनएमधून येते. त्याचं मत आहे की, ही एक कला एकप्रकारचं दर्शन आहे आणि नेहमीच आठवण देते की, तो कुठून आलाय.
तो एका ठराविक कालावधीनंतर आपलं रक्त काढतो आणि त्याचा वापर आपल्या पेंटिंगसाठी करतो. त्याच्यावर टीका अनेकदा होते, पण त्याला आशा आहे की, एक दिवस त्याचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवलं जाईल.