नोकरी सोडताच बॉससह सर्वांचे E-mail पासवर्ड बदलले, तरुणीनं असा घेतला झालेल्या त्रासाचा बदला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 02:16 PM2023-12-21T14:16:04+5:302023-12-21T14:18:02+5:30
आपल्या बॉस आणि सहकाऱ्यां अद्दल घडवण्यासाठी अथवा झालेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी एका तरुणीने अशा पद्धतीने नोकरी सोडली की, संपूर्ण टीममध्य गोंधळ उडाला.
नोकरी करत असताना अनेकांचे आपल्या बॉस सोबत अथवा टीम मेंबर्ससोबत वाद हत अतात. कधी-कधी तर हे वाद एवढे वाढतात की, यावरील पर्याय म्हणून अनेक जण नोकरीही सोडतात. मात्र येथे प्रकरण काहीसे वेगळे आहे. आपल्या बॉस आणि सहकाऱ्यां अद्दल घडवण्यासाठी अथवा झालेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी एका तरुणीने अशा पद्धतीने नोकरी सोडली की, संपूर्ण टीममध्य गोंधळ उडाला. या तरुणीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घेतलेल्या बदल्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने म्हटले आहे की, ऑफीसमध्ये तिच्या सोबत योग्य प्रकरारे व्यवहार होत नव्हता. यामुळे तिने नोकरी सोडली आणि सर्वांचेच ई-मेल पासवर्ड बदलले. ही तरुणी एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती.
Reddit ने आपल्या इंस्टाग्राम पेजवर संबंधित तरुणीची पोस्ट शेअर केली आहे. यात तरुणीने म्हटले आहे, “हे माझे बालिश कृत्य होते, असे कुणी म्हणत असेल तर मला त्याची पर्वा नाही. कारण मला कामावर प्रचंड वाईट वागणूक दिली गेली, यामुळे मी यावर लक्ष केंद्रित करू इच्छित नाही. संपूर्ण टीममध्ये मी एकटीच मुलगी होते, मात्र हे सांगून मी गर्ल कार्ड खेळत नाही."
तरुणी पुढे म्हणते, “नोकरी सोडल्यानंतर साधारणपणे एका आठवड्याने माझ्या लक्षात आले की, मी अजूनही मॅनेजरच्या खात्यात लॉग इन करू शकसत होते. त्याने पासवर्ड बदललेला नव्हता. हे अकाउंट म्हणजे रेस्टॉरन्टचे संपूर्ण डेटाबेस होते. यात मेन्यू, स्टाफ, ऑर्डरिंग, स्टॉक वगैरेची माहिती होती. तो ई-मेल मी तयार केलेल्या एका डुप्लिकेट ई-मेलने बदलला आणि नतंर सर्वांचेच पासवर्ड बदलून टाकले. त्यांना सिस्टिम अॅक्सेस करता येऊ नये असा माझा हेतू होता.”
या पोस्टला हजारो लाइक्स मिळाले आहेत. तरुणीच्या या कृत्यावर सोशल मीडिया युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी तुरुणीचे हे कॉत्य बालीश पणाचे असल्याचे म्हटले आहे तर काहींनी तिच्या या कॉतीचे समर्थन केले आहे.