आता बोला! कधी लाकडाच्या राखेने घासली जात होती भांडी, आता बदामाच्या भावात विकली जात आहे राख....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 11:34 AM2021-03-08T11:34:21+5:302021-03-08T11:35:02+5:30
आता डिजिटल युगात या राखेलाही मोठी किंमत मिळत आहे. आता ही राख आकर्षण पॅकिंग करून ई-कॉमर्स साइट्सवर 'डिश वॉशिंग वुड अॅश'' नावाने विकली जात आहे.
लाकडाच्या राखेबाबत तुम्ही ऐकलं असेलच. पूर्वी चुलीवर स्वयंपाक करताना चुलीतून निघणारी राख बेकार मानून फेकली जात होती. ग्रामीण भागात ही राख भांडी घासण्यासाठी वापरली जात होती. पण आता त्याची जागा लिक्विड आणि साबणांनी घेतली आहे. मात्र, आता डिजिटल युगात या राखेलाही मोठी किंमत मिळत आहे. आता ही राख आकर्षण पॅकिंग करून ई-कॉमर्स साइट्सवर 'डिश वॉशिंग वुड अॅश'' नावाने विकली जात आहे.
या राखेचं मार्केटींग डिश वॉशिंग वुड अॅशच्या नावाने केलं जात आहे. याला मिळणारी किंमतही हैराण करणारी आहे. या राखेची २५० ग्रॅमची किंमत ३९९ रूपये आहे. पण डिस्काउंट देत ही राख १६० रूपयात २५० ग्रॅम विकली जात आहे. म्हणजे डिस्काउंट देऊनही ही राख ६४० रूपये प्रति किलो पडेल.
ई-कॉमर्स साइट्सवर ही राख भांडी घासण्यासाठी फायदेशीर सोबतच झाडांसाठीही खत म्हणून फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारचं उत्पादन तयार करणाऱ्या कंपनी सामान्यपणे तामिळनाडूच्या अधिक आहेत.
वैज्ञानिकांनी सांगितले की, राख भांडी घासण्यासाठी चांगली आहे कारण यात कार्बन असतं. ऱाखेने भांड्यांमधील तेल, डाग निघतात. पण याने चमक वाढत नाही. ही राख सुरक्षितही आहे कारण या केमिकल नसतात. राखेत पोटॅशिअम असतं. याचा शेतात खत म्हणूनही वापर केला जाऊ शकतो.