वाह रे पठ्ठ्या! प्रेयसीला भेटण्यासाठी लॉकाडाऊनमध्ये बनला फेक मॅजिस्ट्रेट, असा झाला त्याचा भांडाफोड....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 10:25 AM2021-05-24T10:25:33+5:302021-05-24T10:31:30+5:30
असे म्हणतात की, प्रेमात प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी काहीही करायला तयार होतात. कदाचित हेच कारण असेल की लोक प्रेमात चंद्र-तारे तोडून आणण्याच्या शपथा घेतात.
प्रेमाचे आतापर्यंत आपण शेकडो किस्से ऐकत आणि बघत आलो आहोत. हे किस्से वाचून कधी हैराण व्हायला होतं तर कधी हसू येतं. असे म्हणतात की, प्रेमात प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी काहीही करायला तयार होतात. कदाचित हेच कारण असेल की लोक प्रेमात चंद्र-तारे तोडून आणण्याच्या शपथा घेतात. पण कधी तुम्ही कुणाला प्रेमात नकली DM बनताना पाहिलंय? जर नसेल पाहिलं तर आज आम्ही तुम्हाला असाच एक किस्सा सांगणार आहोत.
प्रेमासाठी कायपण.....
ही घटना आहे आसामच्या जोरहाटची. इथे एका तरूणाने प्रेयसीसाठी असा काही कारनामा केला की थेट तुरूंगात पोहोचला. मीडिया रिपोर्टनुसार, तरूणाला भर लॉकडाऊनमध्ये प्रेयसीच्या बर्थ डे पार्टीला जायचं होतं. त्यासाठी तो फेक मॅजिस्ट्रेट बनला. पण म्हणतात की, खोटं जास्त वेळ लपून राहत नाही. असंच काहीसं इथंही झालं. ज्यानंतर लोक हसूही लागले आणि हैराणही झाले.
कसा झाला खुलासा?
तरूणाने यासाठी सर्वकाही प्लॅनिंग करून ठेवलं होतं. त्याने सर्वातआधी एक भाड्याने एक गाडी घेतली. डीएम वाटावा म्हणून त्याने कार चालवण्यासाठी एक ड्रायव्हरही ठेवला. इतकंच नाही तर गाडीवर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असं लिहिलं. पण त्याचं हे खोटं पोलिसांसमोर जास्त वेळ टिकलं नाही. पोलिसांनी त्याला पकडलं आणि सर्व सत्य समोर आलं.
ड्रायव्हरने नागालॅंड पोस्टला सांगितलं की, तरूण त्याला बर्थडे पार्टी आणि इतर काही ठिकाणांवर घेऊन गेला. तरूणी तितबारचा फेक डीएम बनून चिनमारा पोलीस स्टेशनमध्येही गेला होता. तिथेच त्याची पोलखोल झाली. तो चौकीवर तैनात पोलिसांची कथितपणे चुकी शोधण्याचा प्रयत्न करत होता. जसं पोलिसांना सत्य समजलं त्यांनी त्याला थेट तुरूंगात टाकलं.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या तरूणाने अनेकदा असं केलं आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन दरम्यान त्याने डॉक्टर बनून अनेकांची फसवणूक केली होती. त्यासोबतच तो जुवेनाइल वकील आणि मेंबर ऑफ द डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन सर्व्हिसचा सदस्य असण्याचंही नाटक त्याने केलं होतं.