पावसात भिजत कर्तव्य बजावले; व्हिडीओ पाहून पोलिसावर कौतुकाचा वर्षाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 10:17 AM2019-04-01T10:17:21+5:302019-04-01T10:20:59+5:30
एका कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : एका कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आसामची राजधानी गुवाहटीला रविवारी वादळी वाऱ्याने झोडपून काढले. यावेळी शहरातील चौकात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी कर्तव्यदक्षतेला असलेल्या वाहतूक पोलिसांने भर पावसात भिजत आपली कर्तव्य पार पाडले.
यासंबंधीचा व्हिडीओ मीडियावर व्हायरल झाला असून या पोलिसाची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे. मिथुन दास असे या पोलिसाचे नाव आहे. गुवाहटी शहरातील बसिस्ता चौकात मिथुन दास ड्युटीवर होते. यावेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र, मिथुन दास यांनी चौकात वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून पावसात भिजत आपली ड्युटी पार पाडली.
Dedication is thy name!
— Assam Police (@assampolice) March 31, 2019
We salute AB Constable Mithun Das (Basistha PS) of @GuwahatiPol , for his exceptional devotion towards duty and showing us how dedication can turn a storm into a sprinkle.
Kudos!
Video Courtesy: Banajeet Deka pic.twitter.com/c6vfHaQBlT
दरम्यान, आसाम पोलिसांनी ट्विटरवर मिथुन दास यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये लिहिले आहे, 'कामाप्रती असलेली निष्ठा, आपल्या कर्तव्याप्रती मिथुन दास यांच्या असामान्य निष्ठेला सलाम. त्यांनी आम्हाला दाखविले की समर्पणापुढे वादळी पाऊस साधारण गोष्ट आहे.'