हत्तीचं दूध का प्यायला लागली ही चिमुकली? पाहून सर्वच झाले अवाक!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 02:06 PM2022-01-31T14:06:02+5:302022-01-31T14:06:18+5:30
मुलीच्या मोठ्या बहिणीने आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी ही घटना पाहिली आणि मुलीला प्रोत्साहन दिले.
सर्वसामान्यपणे लोक गाय, म्हैस आणि बकरी यांसारख्या पाळीव प्राण्यांचे दूध घेतात. परंतु आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील एका मुलीने चक्क हत्तीचे दूध प्यायल्याने प्रत्येकालाच प्राण्याची आणि मानवाच्या प्रेमाची अद्भुत अनुभूती होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तीन वर्षांची हर्षिता बोरा तिच्या घराच्या अंगणात हत्तीसोबत खेळत तिचे दूध पीताना दिसत आहे.
ही मुलगी पिते हत्तीचे दूध -
व्हिडिओमध्ये दिसत आहे, की हर्षिता हत्तीला दूध पाजण्यास सांगत आहे आणि हत्तीने तिचे ऐकले आणि तिला दूध पिण्याची परवानगी दिली. मुलीच्या मोठ्या बहिणीने आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी ही घटना पाहिली आणि मुलीला प्रोत्साहन दिले. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हर्षिता हत्तीला 'बीनू' म्हणते आणि अनेकदा तिच्यासोबत खेळताना दिसते.
Love knows no boundaries, toddler girl drinks milk from elephant pic.twitter.com/xMyUvEUwkB
— Somatirtha Purohit (@somatirtha) January 30, 2022
हत्तीला बीनू म्हणून बोलावते मुलगी -
आसाममधील विविध जिल्ह्यांमध्ये मानव-प्राणी संघर्ष, यातही प्रामुख्याने मानव आणि हत्तींचा संघर्ष वाढताना दिसत आहे. आणि असे असतानाच, ही घटना समोर आली आहे. अधिकृत नोंदीनुसार, 2021 मध्ये हत्तींच्या हल्ल्यात 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तर आसामच्या विविध जिल्ह्यांमध्ये विजेचा धक्का लागून, विषबाधा, ट्रेनची धडक, तलाव आणि खड्डे किंवा वीज पडून तथा आकस्मिकपणे तब्बल 71 हत्तींचा मृत्यू झाला.