हळूहळू मरत आहे आकाशगंगा, वैज्ञानिकांचा खुलासा वाचून व्हाल हैराण....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 03:06 PM2021-01-15T15:06:57+5:302021-01-15T15:15:04+5:30
ही पहिलीच वेळ आहे की, वैज्ञानिकांनी एखादी आकाशगंगा मरताना पाहिलंय. याआधी त्यांना केवळ नष्ट झालेल्या आकाशगंगा पाहिल्या आणि त्यावर अभ्यास केला.
अंतराळात आकाशगंगेचं अस्तित्व कोट्यवधी वर्षांपासून आहे. पण एका ठराविक काळानंतर आकाशगंगा मरते अर्थात नष्ट होते. वैज्ञानिकांनी अशीच एका आकाशगंगा शोधून काढली आहे जी हळूहळू नष्ट होत आहे. ही पहिलीच वेळ आहे की, वैज्ञानिक एखादी आकाशगंगा मरताना बघत आहेत. याआधी त्यांना केवळ मेलेल्या आकाशगंगा पाहिल्या आणि त्यावर अभ्यास केला.
९ अब्ज प्रकाशवर्ष दूर आहे ही आकाशगंगा
वैज्ञानिकांनी पृथ्वीपासून जवळपास ९ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेली आकाशगंगा शोधून काढली आहे. ही आकाशगंगा हळूहळू मरत आहे. या आकाशगंगेत नवीन तारे तयार करणारा गॅस आणि ईँधन हळूहळू नष्ट होत आहे. वैज्ञानिकानी या मरत असलेल्या आकाशगंगेला ID2299 असा कोड दिला आहे.
वैज्ञानिकांनुसार, जेव्हा एखादी आकाशगंगा नवीन तारे बनवू शकत नाही आणि त्यावरील गॅस- ईंधन नष्ट होऊ लागते तेव्हा ती आकाशगंगा नष्ट होते. रिपोर्टनुसार, वर्तमानात आकाशगंगा दरवर्षी १० हजार सूर्य बनवण्या इतकी सामग्रीला थंड गॅसच्या रूपात बाहेर काढत आहे. असे मानले जात आहे की, वर्तमानात या आकाशगंगेचा थंड गॅसचा ४६ टक्क भाग संपला आहे.
काही लाख वर्षांनंतर नष्ट होईल आकाशगंगा
वर्तमानात या आकाशगंगेत नवीन तारे तयार होत आहे. पण आता नवीन तारे तयार होण्याच्या संख्येत कमतरता आली आहे. नवे तारे तयार झाल्याने आकाशगंगेचं इंधन संपू शकतं. अशात आकाशगंगा थंड गॅसचा वापर करेल. त्यानंतर आकाशगंगा काही लाख वर्षात नष्ट होईल.
ब्रिटनच्या डरहम यूनिव्हर्सिटी आणि फ्रान्सच्या सेश्र्ले न्यूक्लिअर रिसर्च सेंटरचे प्रमुख वैज्ञानिक एनाग्राजिया पुगलिसी यांच्यानुसार, आम्ही पहिल्यांदा अंतराळात एका आकाशगंगेला हळूहळू मरताना बघत आहोत. आम्ही या आकाशगंगेवर आणखी जास्त अभ्यास करत आहोत.