मराठ्यांनी जिंकलेला 'हा' किल्ला आज आहे पाकिस्तानात, पण अनेकांना माहीत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:49 PM2023-02-16T13:49:53+5:302023-02-16T13:53:19+5:30
Interesting Facts : इतकेच काय तर पाकिस्तानातील एक किल्लाही मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. तो किल्ला म्हणजे 'अटकेला किल्ला'. चला जाणून घेऊ याबाबत....
Interesting Facts : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली स्वराज्य स्थापनेची घौडदौड त्यांच्यानंतरही मराठ्यांनी सुरू ठेवली होती. पेशव्यांनी भारताच्या वेगवेगळ्या भागात स्वराज्याचा ध्वज फडकावला होता. इतकेच काय तर पाकिस्तानातील एक किल्लाही मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. तो किल्ला म्हणजे 'अटकेला किल्ला'. चला जाणून घेऊ याबाबत....
कुठे आहे हा किल्ला?
28 एप्रिल 1757 रोजी रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वात थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांनी अत्यंत खडतर प्रवास करून आताच्या पाकिस्तानात असलेला अटकेला किल्ला जिंकला होता. हे शहर पाकव्याप्त पंजाब प्रांतांतील तालुक्याचे ठिकाण आहे. येथील सिंधूनदीच्या काठावर अटकचा किल्ला आहे. पूर्वीच्या काळी ही नदी पार करून किल्ल्यावर पोहोचणे अत्यंत अवघड होते. मात्र तरी सुद्धा आपल्या शौर्याने मराठ्यांनी हा किल्ला काबिज केला होता.
मराठ्यांना कसा मिळाला किल्ला?
भारतावर डोळा असलेला अब्दाल मुघल साम्राज्यावर आक्रमण केले होते. अशावेळी मराठ्यांनी मुघलांची मदत करावी असा करार मराठे आणि मुघलांमध्ये झाला होता. त्यानुसार रघुनाथराव पेशव्यांनी मोहीम आखली. यातच मराठ्यांनी आताच्या पाकिस्तानातील अटकेचा किल्ला जिंकला होता.
आता किल्ल्यावर काय आहे?
हा किल्ला आता पर्यंटकांसाठी आकर्षण आहे. इथे तोफखाना आहे. किल्याच्या समोरच कमालिया व जलालिया नावाच्या काळ्या दगडांच्या कड्यांमध्यें सिंधू नदीच्या पात्रांत भोवरे आहेत. तर नदीच्या वरच्या बाजूस, अटकपासून 16 मैलांवर, ओहिंद येथे होड्यांचा पूल करून अलेक्झांडर नदीपार आला असे म्हणतात. आता हा किल्ला पाकिस्तानच्या सैन्याचं केंद्र आहे.
कुणी बांधला?
अकबराने हा किल्ला बांधला होता. त्याचे नाव अटक-बनारस असे ठेवले. 1812 तरणजितसिंहाने या किल्ल्यावर आक्रमण केले होता. पहिल्या शीख युद्धांत इंग्रजांनी हा किल्ला घेतला होता. परंतु, दुसऱ्या युद्धांत तो त्यांना कायम ठेवता आला नाही. नंतर हा किल्ला शीख शीख लोकांकडून इंग्रजांच्या ताब्यात गेला.