हॉटेलसमोर पती गर्लफ्रेन्डसोबत बोलत होता, अचानक तिथे पोहोचली पत्नी आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 12:00 PM2021-08-13T12:00:53+5:302021-08-13T12:14:27+5:30
सांगितलं जात आहे की, महिलेला पतीवर संशय होता की, पती कुणासोबत बोलतो. पण ती याकडे बरेच दिवस दुर्लक्ष करत राहिली. पण....
औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका हॉटेलबाहेर महिलेने पतीला गर्लफ्रेन्डसोबत बोलताना पकडलं. त्यानंतर पत्नी इतकी संतापली की, तिने तिथेच गोंधळ घातला. पत्नी गर्लफ्रेन्डला धलं आणि तिला मारझोड (Wife caught husband with girlfriend) सुरू केली. यादरम्यान घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली. या हायव्होल्टेज ड्रामाचा कुणीतरी व्हिडीओ बनवला. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सांगितलं जात आहे की, महिलेला पतीवर संशय होता की, पती कुणासोबत बोलतो. पण ती याकडे बरेच दिवस दुर्लक्ष करत राहिली. पण पुन्हा तिला संशय आला की, पती दुसऱ्या मुलीसोबत फिरत आहे. त्यानंतर तिने पतीवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. पती घरातून निघाला तेव्हा ती त्याला पाठलाग करत गेली. (हे पण बघा : VIDEO : बॉयफ्रेन्डला दुसऱ्या तरूणीसोबत पाहून भडकली गर्लफ्रेन्ड, भर बाजारात रंगली तरूणींची फाइट)
महिला पतीचा पाठलाग करत औरंगाबादमधील हॉटेल कार्तिकी चौकात पोहोचली. इथे तिने पतीला त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत बघितलं. हा नजारा पाहताच ती रागाने लाल जाली आणि पतीच्या समोरच त्याच्या गर्लफ्रेन्डवर हल्ला केला.
महिलेने धावत जाऊन पतीच्या गर्लफ्रेन्डला पकडलं. तेव्हा ती गाडीत बसण्याचा प्रयत्न करत होती. पत्नीने तरूणीचे केस ओढत तिला मारहाण सुरू केली. यादरम्याान पती सतत पत्नीला समजावण्याचा आणि गर्लफ्रेन्डला वाचवण्याचा प्रयत्न करत होता.
रस्त्यावर हा ड्रामा सुरू होता. पत्नी पुन्हा पुन्हा पोलिसांना बोलवण्याचं म्हणत होती. पण पती तिला समजावत होता. या संपूर्ण घटनेचा घटनास्थळी उपस्थित लोकांनी व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.