अरे बापरे! ८० वर्षीय आजोबा ८४ वर्षीय महिलेला घेऊन झाले फरार, सत्य समोर येताच हैराण झाले लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:00 PM2022-02-22T15:00:29+5:302022-02-22T15:05:03+5:30
Love Story : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, दोघेही सोबत शहरापासून ४८०० किलोमीटर दूर निघून गेले. याची सूचना पोलिसांना देण्यात आली.
असं म्हणतात की, प्रेमाला काही वय नसतं. प्रेम कधी, कुठे आणि कुणाशी होईल हे सांगता येत नाही. काही लोकांना त्यांचं प्रेम मिळतं आणि काही लोकांची प्रेम कहाणी अर्धवट राहिली. तेच काही लोक आयुष्यभर त्यांच्या प्रेमाची वाट बघत असतात. एका वयोवृद्ध व्यक्तीने आपलं प्रेम मिळवण्यासाठी असं काही केलं ज्यावर सहज विश्वास ठेवता येणार नाही. या दोघांच्या प्रेम कहाणीची आता चर्चा होत आहे.
ही आश्चर्यकारक घटना आहे ऑस्ट्रेलियातील (Australia). इथे एक ८० वर्षीय आजोबा आपल्या ८४ वर्षीय गर्लफ्रेन्डला घेऊन फरार झाले. आता तुम्ही विचारात पडले असाल की, अखेर या वयात त्यांनी असं का केलं असेल? चला तर जाणून घेऊया कारण. असं सांगितलं जात आहे की, राल्फ गिब्स नावाची व्यक्ती कॅरोल लिस्ले नावाच्या महिलेवर खूप प्रेम करत होती. राल्फ यांना त्यांच्या गर्लफ्रेन्डची खूप आठवण येत होती. कारण त्या खूप आजारी होत्या आणि त्यांची हालत अशी होती की, त्या बरोबर चालूही शकत नव्हत्या.
इतकंच नाही तर कॅरोल यांची स्मरणशक्तीही कमजोर झाली होती. त्यांना कुणाच्यातरी मदतीची गरज होती, जो त्यांची काळजी घेऊ शकेल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवू शकेल. आपल्या गर्लफ्रेन्डची अशी अवस्था बघून राल्फ अवस्थ झाले आणि त्यांनी नियम-कायदे तोडण्यासाठी तयार झाले.
रिपोर्टनुसार, एका नर्सिंग होममध्ये कॅरोलवर उपचार सुरू होते. राल्फ यांना त्यांचं दु:खं सहन झालं नाही आणि कॅरोल यांना भेटण्यासाठी नर्सिंग होममध्ये गेले. इतकंच नाही तर राल्फ तेथून कॅरोल यांना आपल्यासोबत घेऊन गपचूप निघून गेले. त्यानंतर दोघे काही दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत राहिले आणि सोबत वेळ घालवत राहिले.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, दोघेही सोबत शहरापासून ४८०० किलोमीटर दूर निघून गेले. याची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जेव्हा दोघांचा शोध घेणं सुरू केलं तेव्हा ते दोघेही एका वाळवंटात सापडले. तिथे दोघेही गाडीने फिरत होते. नंतर कॅरोल यांना एअरलिफ्ट करून पर्थ इथे पाठवण्यात आलं.
राल्फ यांच्यावर अनेक चार्ज लावण्यात आले. इतकंच नाही तर याप्रकरणी राल्फ यांना कोर्टात हजर करण्यात आलं. पण राल्फ म्हणाले होते की, त्यांनी जे काही केलं ते प्रेमासाठी केलं. पण कोर्टाने त्यांना ७ महिन्यांचा तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आणि दोन वर्षाची रेस्ट्रेनिंग ऑर्डर दिली आहे. या घटनेने लोक हैराण झाले आहेत आणि लोकांमध्ये या घटनेची चर्चा होत आहे.