पूल टेबलच्या पॉकेटमधून अचानक निघाला अजगर, खेळाडूंची पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 05:02 PM2019-07-29T17:02:18+5:302019-08-22T20:50:11+5:30
काही मित्रांचा ग्रुप पूल खेळण्यासाठी गेला होता. खेळता-खेळता अचानक गोंधळ झाला. सर्वजण इकडून तिकडून पळू लागले. कारण कोणालाच समजेना... पण काहीतरी भयानक घडलयं हे नक्की होतं.
काही मित्रांचा ग्रुप पूल खेळण्यासाठी गेला होता. खेळता-खेळता अचानक गोंधळ झाला. सर्वजण इकडून तिकडून पळू लागले. कारण कोणालाच समजेना... पण काहीतरी भयानक घडलयं हे नक्की होतं. पण काय हे समजायला काही मार्गच नव्हता. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या ब्रिसबेन शहरातील आहे. खरं तर जेव्हा मूलं पूल खेळत होती. तेव्हा अचानक पूल टेबलच्या एका कॉर्नरमधून अचानक अजगर आला. ब्रिसबेन स्नेक कॅचर्सनी मंगळवारी या घटनेचे फोटो त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केले आहेत. अजगर त्यावेळी टेबलच्या त्या कॉर्नर पॉकेटमध्ये आराम करत होता.
तुम्ही असे खेळत असाल आणि जर अचानक अजगर आला तर तुम्ही काय केलं असतं. पळापळ झाल्यानंतर मित्रांनी स्नेक कॅचर्सला फोन करून अजगर असल्याची माहिती दिली. त्यावेळी ब्रिसबेन स्नेक कॅचर्सच्या टिमने तिथे येऊन अजगराला पकडले.
ब्रिसबेन स्नेक कॅचर्सनी दोन फोटो शेअर करताना असं लिहिलं आहे की, 'जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पूल गेम खेळण्यासाठी जाल आणि अचानक कॉर्नर पॉकेटमधून अजगर समोर आला तर...' याचसोबत त्यांनी लिहिलं की, लक्षात ठेवा, जेव्हाही पूल खेळण्यासाठी जाल तेव्हा पूल टेबलचे पॉकेट्स नक्की चेक करा.'
ब्रिसबेन स्नेक कॅचर्सनी शेअर केलेली ही पोस्ट व्हायरल झाली असून आतापर्यंत 4 हजार लोकांनी शेअर केली आहे. तसेच या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी अजगर फार गोड दिसत असल्याचे सांगितले आहे. तर आणखी एका यूजरने असं लिहिलं आहे की, 'अजगराचा चेहरा फार छोटा दिसत असला तरिही तो फार गोड दिसत आहे.'
पूल पॉकेटमध्ये आढळून आलेला हा पायथॉन विषारी नसतो. ऑस्ट्रेलियामध्ये हा अजगर आढळून आला आहे. सनशाइन स्नेक कॅचर्सने व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, कारपेट अजगर साधारण साप आहे. ज्यांना अगदी सहज पकडणं शक्य होतं. हे अजगर माणसांना अजिबात त्रास देत नाहीत.