'या' देशाच्या पंतप्रधानांनी बनवली खिचडी, अभिमानाने शेअर केले फोटो...कुटुंबालाही आवडली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:18 PM2022-04-12T15:18:17+5:302022-04-12T15:23:38+5:30

खिचडी आता जागतिक स्तरावर गाजत आहे. निमित्तं ठरतंय ते म्हणजे पंतप्रधानांनी शेअर केलेला एक फोटो.  खिचडी म्हटल्यावर तुम्हाहा जर ते पंतप्रधान मोदी वाटत असतील तर, तसं नाही. अर्थात इथं असणारं मोदी कनेक्शन मात्र नाकारता येत नाही. 

Australia PM Scott Morrison cooks Khichdi to celebrate new trade agreement with India. See pics | 'या' देशाच्या पंतप्रधानांनी बनवली खिचडी, अभिमानाने शेअर केले फोटो...कुटुंबालाही आवडली

'या' देशाच्या पंतप्रधानांनी बनवली खिचडी, अभिमानाने शेअर केले फोटो...कुटुंबालाही आवडली

googlenewsNext

सात्विक आहारामध्ये सातत्यानं पसंती मिळणारा एक पदार्थ म्हणजे, खिचडी. आजारपण असो,  प्रवासातून घरी परतल्यावर असो किंवा मग काहीतरी सात्विक खायची इच्छा असो.... सर्वांच्या डोळ्यांपुढे एकच पदार्थ येतो. तो म्हणजे खिचडी. हीच खिचडी आता जागतिक स्तरावर गाजत आहे. निमित्तं ठरतंय ते म्हणजे पंतप्रधानांनी शेअर केलेला एक फोटो.  खिचडी म्हटल्यावर तुम्हाहा जर ते पंतप्रधान मोदी वाटत असतील तर, तसं नाही. अर्थात इथं असणारं मोदी कनेक्शन मात्र नाकारता येत नाही. 

खिचडी बनवून सर्वांचं लक्ष वेधणारे हे पंतप्रधान आहेत, स्कॉट मॉरिसन. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या स्कॉट यांनी नुकतेच काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ते स्वयंपाकघरात खिचडी बनवताना दिसत आहेत. 

भारत- ऑस्ट्रेलियामध्ये एक महत्त्वाचा करार झाल्याच्या आनंदात त्यांनी ही भारतीय व्यंजनं बनवली. पंतप्रधान मोदी यांच्या आवडीची खिचडी बनवल्याची प्रतिक्रिया त्यांनी कॅप्शनमधून दिली. मॉरिस यांची पत्नी, जेन, मुली आणि त्यांच्या आईनंही त्यांच्या या खिचडींना हिरवा झेंडा दाखवला आहे, ज्यामुळं त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हेच त्यांनी लिहिलेलं कॅप्शन सांगून जातं. एका राष्ट्राचे पंतप्रधान असतानाही मॉरिस यांच्या जगण्याचा हा अंदाज सध्या सर्वांचीच मनं जिंकताना दिसत आहे.

Web Title: Australia PM Scott Morrison cooks Khichdi to celebrate new trade agreement with India. See pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.