शाळेत जात असलेल्या मुलावर पडली वीज, वाचण्याचं कारण समजल्यावर डॉक्टर झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 06:25 PM2021-10-29T18:25:40+5:302021-10-29T18:30:57+5:30

Australia : ऑस्ट्रेलियातील एका शाळकरी मुलासोबत असंच झालं.  त्याचा जीव एका अशा वस्तूमुळे वाचला की, डॉक्टरही हैराण झाले.

Australia : School going boy was struck by lightning and saved due to thick rubber shoes | शाळेत जात असलेल्या मुलावर पडली वीज, वाचण्याचं कारण समजल्यावर डॉक्टर झाले हैराण

शाळेत जात असलेल्या मुलावर पडली वीज, वाचण्याचं कारण समजल्यावर डॉक्टर झाले हैराण

Next

मृत्यूच्या दारातून परत येणं फारच नशीबाची बाब असते. अनेकदा एका क्षणाचाही उशीर झाला तर जीव जाऊही शकतो आणि जीव वाचूही शकतो. अनेकदा अशा स्थितींमुळे आणि वस्तूंमुळे अनेकांचा जीव वाचतो. ज्यांवर विश्वास ठेवणं अवघड होऊन बसतं. ऑस्ट्रेलियातील (Australia) एका शाळकरी मुलासोबत असंच झालं.  त्याचा जीव एका अशा वस्तूमुळे वाचला की, डॉक्टरही हैराण झाले.

मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार, गेल्या शुक्रवारी १४ वर्षीय टॅलिन रोज जेव्हा शाळेत जात होता, तेव्हा वादळ-वाऱ्यात आकाशातून त्याच्या अंगावर वीज पडली. टॅलिन यामुळे खाली पडला आणि त्याच्या सर्व मांसपेशी एकदम सुन्न झाल्या. काही मिनिटे त्याला ना काही ऐकायला मिळालं ना काही जाणवलं.

यानंतर त्याने त्याच्यासोबत झालेल्या घटनेची सूचना आईला दिली. यादरम्यान एका मुलाच्या वडिलाने टॅलिनला पाहिलं आणि ते तात्काळ त्याला जवळच्या शाळेच्या आत घेऊन गेले. काही वेळातच डॉक्टरही शाळेत पोहोचले आणि टॅलिनला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

कशामुळे वाचला जीव

पॅरामेडिकल स्टाफ जेव्हा शाळेपर्यंत पोहोचला तोपर्यंत टॅलिन आपोआप ठीक होऊ लागला होता. पण तरीही त्याच्या काही टेस्ट करण्यासाठी त्याला हॉस्पिस्टलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टर हैराणही होते की, अखेर मुलगा या घटनेतून वाचलाच कसा. पूर्ण टेस्ट केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की, टॅलिनच्या रबरच्या शूजने त्याचा जीव वाचवला. शूजने विजेला एब्जॉर्ब केलं आणि टॅलिनला जास्त नुकसान झालं नाही. पण त्याच्या शरीरावर काही निशान पडले. हे निशाण ३ दिवसात ठीक होतील.
 

Web Title: Australia : School going boy was struck by lightning and saved due to thick rubber shoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.