बाबो! जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत साखरपुडाही केला; लग्नानंतरचं प्लॅनिंग ऐकाल तर थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:33 PM2021-06-15T17:33:55+5:302021-06-15T17:35:37+5:30

रिएलिटी टीव्ही शोमध्ये या दोन्ही जुळ्या बहिणींची कहाणी जगासमोर आली. या दोघीही एकमेकांपासून कधीही दूर होऊ इच्छित नाही.

In Australia twin sisters engaged to same person want to be pregnant together | बाबो! जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत साखरपुडाही केला; लग्नानंतरचं प्लॅनिंग ऐकाल तर थक्क व्हाल

बाबो! जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत साखरपुडाही केला; लग्नानंतरचं प्लॅनिंग ऐकाल तर थक्क व्हाल

Next
ठळक मुद्दे३५ वर्षीय एना आणि लुसी डेसिंग या दोघींनी ३७ वर्षीय बेन बायर्न्ससोबत साखरपुडा उरकला आहेदोघी बहिणी २०११ पासून बेन बायर्न्सला डेट करत होत्या. एका पार्कमध्ये पिकनिकवेळी बेन या दोघींना भेटला होता.मला तुमच्यासोबत आयुष्य जगायचंय, माझ्याशी लग्न कराल का? बेननं केलं प्रपोज

ऑस्ट्रेलिया एका जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत साखरपुडा केलंय इतकचं नाही तर या दोघींनाही एकाच वेळी प्रेग्नेंट होण्याची इच्छा आहे. या बहिणींनी रिएलिटी टीव्ही शोमध्ये त्यांच्या भविष्याबद्दलच्या प्लॅनिंगमध्ये याचा खुलासा केला होता. या बहिणी एकाच व्यक्तीच्या प्रेमात कशा काय पडल्या? याबाबत दोघींनी मुलाखतीत सांगितलं आहे जे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

रिएलिटी टीव्ही शोमध्ये या दोन्ही जुळ्या बहिणींची कहाणी जगासमोर आली. या दोघीही एकमेकांपासून कधीही दूर होऊ इच्छित नाही. दोघीही एकमेकींवर प्रचंड प्रेम करतात. ३५ वर्षीय एना आणि लुसी डेसिंग या दोघींनी ३७ वर्षीय बेन बायर्न्ससोबत साखरपुडा उरकला आहे. बेन बायर्न्स हा इलेक्ट्रिशिएशन आहे. दोघी बहिणी २०११ पासून बेन बायर्न्सला डेट करत होत्या. एका पार्कमध्ये पिकनिकवेळी बेन या दोघींना भेटला होता. तेव्हा पहिल्याच भेटीत बेनला या दोन्ही मुली आवडल्या. त्याने दोघींनी प्रपोज केले.

बेनने दोघींना प्रपोज करताना सांगितले की, मला तुमच्यासोबत आयुष्य जगायचंय, माझ्याशी लग्न कराल का? या प्रश्नावर दोघींनीही त्याला होकारा दिला. Independent वेबसाईटनुसार, ऑस्ट्रेलियात एकापेक्षा अधिक विवाह कायद्यानं मान्य नाही. तेव्हा जुळ्या बहिणींनी ते मलेशिया, इंडोनेशिया अथवा अमेरिकेत जाऊन लग्न करू शकतो असं म्हटलं. बायर्न्सला त्याच्या होणाऱ्या बायकांना वचन दिलंय की, तो दोघींनाही आनंदात ठेवण्यासाठी काहीही करायला लागलं तरीही तो तयार आहे.

दुसरीकडे एना आणि लुसीने सांगितले की, आम्हाला एकाच वेळी गर्भवती व्हायचं आहे. त्यासाठी ते आयव्हीएफच्या माध्यमातून गर्भवती राहण्याचं प्लॅनिंग करत आहेत. एना म्हणते की, जर मी गर्भवती झाली तर लुसीही निश्चितपणे गर्भवती राहील. कारण आमचं शरीराला समान होण्याची गरज आहे. २०१९ मध्येच दोन्ही बहिणींनी ऑस्ट्रेलियातील एका शोमध्ये एकत्रच गर्भवती होण्याची प्लॅनिंगबद्दल जगाला सांगितले होते. तसेच एकत्र गर्भवती होणं कठीण आहे हे त्यांनी मान्य केले. कारण या दोघींच्या या प्लॅनिंगमुळे बेन बायर्न्सवर दबाव येईल त्यांना माहिती आहे.

Web Title: In Australia twin sisters engaged to same person want to be pregnant together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न