मशरूमच्या माध्यमातून महिलेने तीन लोकांचा घेतला जीव, केसमुळे पोलिसांनाही फुटला घाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 01:34 PM2023-11-03T13:34:11+5:302023-11-03T13:36:46+5:30
पोलिसांनी एरिन नावाच्या महिलेची चौकशी केली. तेव्हा धक्कादायक खुलासा झाला.
हत्येच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. पण एक अशी घटना समोर आली आहे ज्यावर तुमचा सहज विश्वास बसणार नाही. एका महिलेने आपल्या नातेवाईकांना लंचसाठी बोलवलं आणि त्यांना जेवणात मशरूम दिलं. जे खाऊन 3 नातेवाईकांचा मृत्यू झाला. तिच्यावर 3 लोकांच्या हत्येचा आरोप आहे. ही घटना ऑस्ट्रेलियामधील आहे. पोलिसांनी एरिन नावाच्या महिलेची चौकशी केली. तेव्हा धक्कादायक खुलासा झाला.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, विल्किनसनचे पती इयानचा जीव वाचला. तो दोन महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर रिकव्हर होत आहे. पोलिसांनी सांगितलं की, एरिनवर तीन लोकांची हत्या आणि पाच लोकांच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप आहे. महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि शुक्रवारी सकाळी मोरवेल मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केलं जाईल.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हत्येच्या प्रयत्नाच्या दोन्ही केस 2021 आणि 2022 मध्ये व्हिक्टोरियामध्ये घडल्या होत्या. पोलिसांनी आरोप केला की, व्हिक्टोरियातील एक व्यक्ती या दोन्ही तारखांना जेवण केल्यावर आजारी पडली होती. एरिनने आपल्या नातेवाईकांना लंचसाठी बोलवलं होतं. तिने यांना जेवणात डेथ कॅप मशरूम दिले होते. जे विषारी असतात. हे खाल्ल्यानंतर किडनी आणि लिव्हर फेल होते.
ही घटना 29 जुलैला तिच्या घरी घडली होती. पण ती पोलिसांना सांगत होती की, तिने असं मुद्दाम केलं. एरिनने लंच तिचा आधीचा पती सिमन पीटरसन यालाही बोलवलं होतं. पण त्याने येण्यास नकार दिला होता. पोलिसांना आधीपासून तिच्यावर संशय होता कारण या लंचनंतर एरिन स्वत: आणि तिची दोन मुलं आजारी पडली नव्हती.
आधी एरिन म्हणाली की, तिच्याकडे या लोकांना नुकसान पोहोचवण्याचं कोणतंही कारण नव्हतं. कारण ती त्यांच्यावर प्रेम करते. ती असंही म्हणाली होती की, तिला वाईट वाटलं की, हे मशरूम खाऊन तिच्या जवळचे लोक आजारी पडले. प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी डीन थॉमस यांनी लोकांना हे लक्षात ठेवण्यास सांगितलं की, तीन लोकांचा जीव गेला.
ते म्हणाले की, 'गेल्या तीन महिन्यात ही चौकशी वेगाने करण्यात आली. मी असा याआधी कोणत्याही केसबाबत विचार केला नाही. या केसची केवळ देशातच नाही तर दुसऱ्या देशांमध्येही चर्चा केली जात आहे. मला वाटतं की, हे खासकरून लक्षात ठेवलं पाहिजे की, तीन लोकांचा जीव गेला आहे'.