बाबो! कपलने बाळाचं असं नाव ठेवलं की, २०८० पर्यंत फ्री खायला मिळणार पिझ्झा....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 11:18 AM2020-12-26T11:18:15+5:302020-12-26T11:19:48+5:30
जगभरात लोकप्रिय पिझ्झा कंपनी Domino's कंपनीने या कपलला सांगितले की, त्यांनी ६० वर्षांपर्यंत मोफत पिझ्झा खाण्याची पैज जिंकली आहे.
आई-वडील झाल्यावर सर्वात मोठं काम असतं आपल्या बाळाला एक नाव देणं. काही पालक आपल्या बाळांना पॉप्युलर नाव देतात तर काही लोक असेही असतात जे त्यांच्या बाळाचं नाव यूनिक किंवा रेअर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण ऑस्ट्रेलियातील एका कपल आपल्या बाळाचं असं नाव ठेवलं की, त्यांना आता २०८० वर्षांपर्यंत फ्रीमध्ये पिझ्झा खायला मिळणार आहे. झालं असं की, जगभरात लोकप्रिय पिझ्झा कंपनी Domino's कंपनीने या कपलला सांगितले की, त्यांनी ६० वर्षांपर्यंत मोफत पिझ्झा खाण्याची पैज जिंकली आहे.
काय होती पैज?
मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीला ६० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने डॉमिनोजने इन्स्टाग्रामवर एका पोस्टमधून एका स्पर्धेची घोषणा केली होती. अट अशी होती की, ऑस्ट्रेलियामध्ये जर कुणाचं बाळ ९ डिसेंबर २०२० ला जन्माला येत असेल आणि त्याचे पालक त्याचं नाव Dominic किंवा Dominique ठेवत असतील तर त्यांना पुढील ६० दशकं म्हणजे ६० वर्षे फ्रीमध्ये डॉमिनोज पिझ्झा खाऊ शकतात.
सिडनीतील क्लेमेंटाइन आणि एंथनी लूत यांनी हे चॅलेंज जिंकलं आहे. त्यांना याची माहितीही नव्हती. हे कपल आधीच मुलाचं नाव Dominic ठेवणार होते. जेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी त्याला स्पर्धेबाबत सांगितलं तेव्हा ते याचा भाग झालेय ९ डिसेंबरला संपूर्ण ऑस्ट्रेलियात या एकुलत्या एका कपलने आपल्या मुलाचं नाव कंपनीने सुचवलेलं ठेवलं. आता पैजेनुसार, या कपलला ६० वर्षांपर्यंत दर महिन्याला १४ डॉलरचा पिझ्झा फ्री मिळणार आहे.