थरारक! कार चालवताना ब्रेकजवळ लपून बसलेल्या विषारी सापासोबत तरूणाचा लढा, वाचा पुढे काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 04:08 PM2020-07-08T16:08:37+5:302020-07-08T16:08:50+5:30
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरूणाने विषारी सापासोबत जोरदार लढा दिला, पण तोपर्यंत सापाने त्याला दंश केला होता.
ऑस्ट्रेलियातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणावर तो कार चालवत असताना एका विषारी सापाने हल्ला केला. इतकेच नाही तर तो साप दूर करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा सापाने त्याला वेढा दिला. हे इतक्यावरच थांबलं नाही. त्यानंतर पुढे जे झालं ते वाचून व्हाल अवाक्...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरूणाने विषारी सापासोबत जोरदार लढा दिला, पण तोपर्यंत सापाने त्याला दंश केला होता. क्वीन्सलॅन्ड पोलिसांनी व्हिडीओ जारी करून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, या तरूणावर जगातल्या सर्वात विषारी सापाने हल्ला केला होता. भुरक्या रंगाचा हा साप जगातल्या सर्वात खतरनाक सापांमध्ये गणला जातो. इतकेच नाही तर आतापर्यंत या सापाच्या दंशाने अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
या घटनेची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा एका स्थानिक रोड पोलिसाने पाहिले की, एक व्यक्ती 123 किमी प्रति तासाच्या वेगाने गाडी चालवत आहे. तेव्हा पोलिसाने तरूणाचा पाठलाग केला. पण जेव्हा ते वाहनाजवळ पोहोचले तेव्हा संपूर्ण गंभीर स्थिती त्याला समजली आणि त्याने लगेच मेडिकल हेल्प मागवली.
तरूण क्वीन्सलॅंडमध्ये डॉसन हायवेवर गाडी चालवत होता. अचानक एका विषारी सापाने त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांनुसार, या तरूणाचं नाव जिमी आहे आणि त्याचं वय 27 आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला सापाने दंश केल्याने तो गाडी वेगाने चालवत होता.
जिमीने सांगितले की, 'मी 100 किमी प्रति तास वेगाने गाडी चालवत होतो. जेवढ्या वेळा मी ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत होतो साप माझ्या पायाचा वेढा आणखी घट्ट करत होता. मी पाय हलवला आणि सापाने पायाच्या चारही बाजूने वेढा देण्यास सुरूवात केली. त्याचं डोकं ड्रायव्हरच्या सीटवर दिसून येत होतं'. त्याने सांगितले की, त्याने सीट बेल्ट आणि चाकूचा वापर केला आणि सापाशी भिडला. पण जेव्हा त्याला समजले की, सापाने त्याला आधीच दंश केला होता, तेव्हा त्याने सापाला मारण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा पर्याय निवडला.
जबरदस्त! पर्यावरण आणि आरोग्यासाठी फायदेशीर बांबूचा खास टिफिन, व्हिडीओ पाहून खूश झाले लोक....
जबरदस्त! भारतात खऱ्याखुऱ्या 'बगीराचा' बिनधास्त वावर कॅमेरात कैद, पाहा व्हायरल फोटो