'आता नोकरी करणार नाही...', 400 कोटींची लॉटरी जिंकताच व्यक्तीने केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 07:52 PM2022-11-14T19:52:49+5:302022-11-14T19:54:14+5:30
ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला तब्बल 432 कोटींची लॉटरी लागली आहे.
नशीबवान असलेला व्यक्तीच लॉटरी जिंकू शकतो. लॉटरी जिंकण्यासाठी मेहनतीची नाही, तर नशीबाची साथ असावी लागते. ऑस्ट्रेलियातील नशीबवान व्यक्तीला पॉवरबॉल गेममध्ये तब्बल 432 कोटी रुपयांची लॉटरी लागली. त्या लॉटरी विजेत्याने करोडो रुपये जिंकल्यानंतर लगेचच आपण यापुढे नोकरी करणार नसल्याचे जाहीर केले आणि निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याच्या डोळ्यात पाणीही आले.
लॉटरी जिंकल्यानंतर news.com.au शी बोलताना तो माणूस म्हणाला- मला कधीच वाटले नव्हते की, मला जॅकपॉटची रक्कम जिंकल्याबद्दल कॉल येईल आणि माझे आयुष्य बदलून जाईल. या पैशातून मी माझ्या कुटुंबीयांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. आता यापुढे मी नोकरी करणार नाही, निवृत्ती घेऊन आरामदायी आयुष्य जगेल, असे त्याने सांगितले. दरम्यान, विजेत्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पॉवरबॉल लॉटरीची 1296 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम तीन भाग्यवान विजेत्यांना वाटली गेली. गेल्या महिन्याच्या 27 तारखेला पॉवरबॉल ड्रॉ काढण्यात आला, तेव्हा विजेते 10, 4, 12, 18, 2, 34 आणि 7 होते. सर्वात महत्त्वाचा पॉवरबॉल क्रमांक 7 होता. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत पॉवरगेम खेळणाऱ्या एका व्यक्तीने तब्बल 16605 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले होते. या व्यक्तीने अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते.