28 लाख रूपये खर्च करून धडाक्यात केलं लग्न, न सांगताच पळून गेला पती आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 12:30 PM2023-06-12T12:30:25+5:302023-06-12T12:31:14+5:30
Woman Ghosted By Husband : नुकताच ऑस्ट्रेलियातील एका मुलीने तिचा अनुभव शेअर केला. ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत.
Woman Ghosted By Husband : प्रेम-लग्न हे आयुष्यातील असे क्षण असतात ज्यात लोक अनेक अपेक्षा ठेवून असतात. खासकरून लग्न केल्यानंतर र कपल्स याबाबत फार सीरिअस होतात. पण सगळ्या केसमध्ये असं होत नाही. नुकताच ऑस्ट्रेलियातील एका मुलीने तिचा अनुभव शेअर केला. ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, इसाबेल ग्लास्टनबरी (Isabelle Glastonbury) नावाची एक महिला अमेरिकेतील तरूणाच्या प्रेमात पडली होती. ती प्रेमात अशी काही आंधळी झाली होती. तिला हे काहीच कळालं नाही की, ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली होती तो तिला मोठा दगा देणार आहे. आता तरूणी तिच्या अनुभवानंतर इतरांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहे.
इसाबेल ग्लास्टनबरी (Isabelle Glastonbury) ची भेट 2015 मध्ये एका अमेरिकन तरूणासोबत झाली होती. दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि हळूहळू प्रेम वाढत गेलं. त्यांनी काही दिवसताच साखरपुडा केला. दोघेही सोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहत होते. 31 वर्षीय इसाबेल प्रेमात आंधळी झाली होती आणि तिने 28 लाख रूपये खर्च करून बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. पण यानंतर एक ट्विस्ट आला.
इसाबेलने सांगितलं की, तिच्या पतीचा व्हिसा ज्यादिवशी मिळाला, त्या दिवशी दोघेही सेलिब्रेट करण्यासाठी डिनरला गेले होते. पण जेव्हा ती परत आली तेव्हा घराचा नजाराच बदलला होता. पतीचं 90 टक्के सामान गायब झालं होतं आणि तो स्वत:ही दिसत नव्हता. जेव्हा ती लग्नात सामिल झालेल्या तिच्या नातेवाईकांसोबत बोलत होती. तेव्हा कुणीही त्याचा उल्लेख केला नाही. त्याने इमिग्रेशन अकाऊंटपासून सगळं काही ब्लॉक केलं होतं. कोणत्याही कॉल किंवा मेसेजचा तो उत्तर देत नव्हता. 2021मध्ये त्यांची भेटझाली आणि तेव्हा तिला समजलं की, दुसऱ्या तरूणीसोबत शिफ्ट झाला आहे.