Video : खाता खाता शार्कनं तरुणीलाच पाण्यात खेचलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:29 PM2018-07-14T18:29:54+5:302018-07-14T18:30:08+5:30
ऑस्ट्रेलियाच्या डुगोंग खाडीमध्ये शार्कला खायला घालायला गेलेली मेलिसा ब्रनिंग स्वतः त्यांचं खाणं होता होता वाचली. मरणाच्या दारातून वाचलेल्या मेलिसाने स्वतः इंटरनेटवरून आपला थरारक अनुभव शेअर केला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डुगोंग खाडीमध्ये शार्कला खायला घालायला गेलेली मेलिसा ब्रनिंग स्वतः त्यांचं खाणं होता होता वाचली. मरणाच्या दारातून वाचलेल्या मेलिसाने स्वतः इंटरनेटवरून आपला थरारक अनुभव शेअर केला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मेलिसा आपल्या मित्रांसोबत दिसत आहे. मेलिसा उभी असलेल्या ठिकाणी शार्क मासे वावरत असल्याचे व्हिडीओमध्ये पहायला मिळतेय. मेलिसा त्यांना खायला देत असताना काही शार्क्सना ते खाणं मिळालं नाही, त्यामुळे मेलिसा थोडं पुढे जाऊन त्यांना खायला देते. पण तेवढ्यात शार्क मेलिसाच्या बोटाचा चावा घेत तिला पाण्यामध्ये खेचून घेतो. मेलिसाचे नशीब बलवत्तर होतं म्हणून त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या तिच्या मित्राने वेळीच तिला पाण्यातून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडीओ तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तिनं सोशल मीडियावर टाकला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.
मेलिसाने आपल्या पोस्टमधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाला त्याच्यासोबत पृथ्वीतलावावर उपस्थित असलेल्या इतर सजीव प्राण्यांसोबत कसे रहायचे हे समजले पाहिजे. असे तिने सांगितले आहे. तसेच सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेलिसाने त्याप्रसंगाचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'मला आश्चर्य वाटतं आहे की हा व्हिडीओ संपूर्ण जगभर प्रचंड व्हायरल झाला आहे. मला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे की, हा शार्कने केलेला हल्ला नव्हता तर ती पूर्णतः माझी चूक असून त्याची शिक्षा मी भोगत आहे. पाणी हे त्यांचे घर आहे. त्यामुळे आपण त्यापासून लांबच राहिले पाहिजे. माझी विचारपूस करणाऱ्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. मी ठिक आहे.'
दरम्यान, मेलिसासोबत ज्या खाडीवर प्रसंग घडला ती जगातील सर्वात मोठ्या शार्क खाड्यांपैकी एक आहे. येथे जगभरातून अनेक पर्यटक जलजीवांना पाहाण्यासाठी येत असतात.