शाम्पूच्या बॉटलमध्ये लपवत होती दारू, दिवसरात्र तिची व्यसनमुक्तची कहाणी वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 10:42 AM2023-05-12T10:42:31+5:302023-05-12T10:57:30+5:30

दारूच्या नशेमुळे उद्ध्वस्त झालेल्या अनेक लोकांचे किस्से तुम्ही ऐकले असतील. पण सध्या ऑस्ट्रेलियातील एका महिलेची कहाणी सगळ्यांनाच हैराण करत आहे. 

Australian woman hide alcohol shampoo bottle drink mouthwash get high alcohol addiction treatment | शाम्पूच्या बॉटलमध्ये लपवत होती दारू, दिवसरात्र तिची व्यसनमुक्तची कहाणी वाचून व्हाल अवाक्....

शाम्पूच्या बॉटलमध्ये लपवत होती दारू, दिवसरात्र तिची व्यसनमुक्तची कहाणी वाचून व्हाल अवाक्....

googlenewsNext

दारूमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झालेत. लोकांना याची इतकी सवय लागते की, त्यासमोर त्यांना चांगलं-वाईट काहीच दिसत नाही. त्यांना दारूशिवाय दुसरं काही सुचत नाही. पण जेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते तोपर्यंत उशीर झालेला असतो. दारूच्या नशेमुळे उद्ध्वस्त झालेल्या अनेक लोकांचे किस्से तुम्ही ऐकले असतील. पण सध्या ऑस्ट्रेलियातील एका महिलेची कहाणी सगळ्यांनाच हैराण करत आहे. 

डेली स्टार न्यूज वेबसाइटने गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया (Gold Coast, Australia) ची जस्टिन व्हिटचर्च (Justine Whitchurch) ची मुलाखत घेतली. तिला दारूचं इतकं व्यसन लागलं होतं की, थेट मृत्यूच्या दारात पोहोचली होती. मात्र, योग्य मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला आणि आता 49 वयात ती एक बदललेली व्यक्ती आहे. तिची कहाणी जाणून घेणं तरूणांसाठी फार गरजेचं आहे. जे या नरकात लोटले जात आहेत. 

शाम्पूच्या बॉटलमध्ये लपवत होती दारू

जस्टिन आता एक पर्सनल फिटनेस ट्रेनर, लेखिका आणि दोन मुलांची आहे. पण कमी वयात ती इतकी दारू पित होती की, त्याशिवाय तिचं पान हलत नव्हतं. परिवारापासून लपवण्यासाठी ती बाथरूममध्ये शाम्पूच्या बॉटलमध्ये दारू लपवत होती. जेव्हाही बाथरूमला जात होती दारू पित होती. जेव्हा तिला दारू प्यायला मिळत नसे तेव्हा ती माउथवॉश प्यायची. एकदा तिने दारू सोडण्याचा विचार केला, पण दृढ निश्चय करू शकली नाही. त्यानंतर ती रोज 3 वाइनच्या बॉटल संपवत होती. सोबत वोडक्याचे शॉट्स घेत होती. इतकी दारू प्यायल्यानंतर तिच्या पोटात कॅन्सरची लक्षण दिसू लागली होती. ती मृत्यूच्या दारात पोहोचली होती.

जस्टिनच्या परिवारातील लोक, मुलं सगळेच वैतागले होते. ती म्हणाली की, ती 15 वर्षाची होती तेव्हा पहिल्यांदा दारू प्यायली होती. बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यावर तिला जास्त सवय लागली. नंतर पतीपासून घटस्फोट झाला मग सवय आणखी वाढली.

या सवयीमुळे जस्टिनचं वजन कमी होऊन 46 किलो इतकंच झालं होतं. 2012 मध्ये तिने दारू सोडण्याचा निर्णय घेतला. आधी व्यसनमुक्ती केंद्रात गेली, तिथे फार उपयोग झाला नाही. मग तिच्या सायकॉलॉजिस्टने तिला जिममध्ये एक्सरसाइज करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिच्या बराच बदल झाला. तिचं मानसिक आरोग्य सुधारू लागलं. आता तिला दारू सोडून 9 वर्षे झालीत. ती म्हणते की, तिला आता खूप फिट वाटतं. आता ती दुसऱ्यांना सल्ले देते. ती म्हणते की, दारू सोडण्यासाठी कधीच उशीर होत नसते, व्यक्तीने मनात आणलं तर ते सोडू शकतात.

Web Title: Australian woman hide alcohol shampoo bottle drink mouthwash get high alcohol addiction treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.