बाबो! अपघातानंतर कोमात गेली तरुणी; शुद्धीवर येताच बॉयफ्रेंडचा मेसेज पाहून हादरली, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:41 PM2022-06-09T12:41:51+5:302022-06-09T12:42:19+5:30

कार पार्किंगमधून खाली पडली. त्यानंतर तिला अल्बर्टा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जिथे तिला आयसीयूमध्ये लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं.

australian woman wakes up from coma find fiance moved in with someone else | बाबो! अपघातानंतर कोमात गेली तरुणी; शुद्धीवर येताच बॉयफ्रेंडचा मेसेज पाहून हादरली, झालं असं काही...

बाबो! अपघातानंतर कोमात गेली तरुणी; शुद्धीवर येताच बॉयफ्रेंडचा मेसेज पाहून हादरली, झालं असं काही...

Next

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या ब्री सध्या टिकटॉकवर चर्चेचा विषय बनली आहे. तिने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये टिकटॉकवर तिच्यासोबत घडलेल्या एका भयंकर घटनेचा उल्लेख केला होता, जे लाखो लोकांनी पाहिलं होतं. ब्रीने सांगितलं की जेव्हा तिला तिची स्वप्नातील नोकरी मिळाली तेव्हा ती कॅनडाला गेली. ती 4 वर्षांपासून तिच्या होणाऱ्या पतीसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि तिचा दावा आहे की दोघांचा साखरपुडाही झाला होता.

29 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या अपघातानंतर सर्व काही बदललं. ती एका कार पार्किंगमध्ये होती, जिथे एका भिंतीचं बांधकाम चालू होतं. तिला अंधारात काहीही दिसत नव्हतं आणि तिची कार पार्किंगमधून खाली पडली. त्यानंतर तिला अल्बर्टा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जिथे तिला आयसीयूमध्ये लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं. तिची अनेक हाडं मोडली होती आणि मेंदूलाही दुखापत झाली होती. चार आठवडे ती कोमात राहिली.

डॉक्टरांनी तिच्या आईला सांगितलं की यात ती वाचण्याची शक्यता फक्त 10 टक्के आहे. पण ब्रीची तब्येत सुधारू लागली आणि ती अचानक उभी राहिली. तिला जाग आल्यावर स्मृतिभ्रंश झाला. मात्र, तरी तिने त्या संध्याकाळच्या घटना पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ब्रीला तिचा मोबाईल परत दिला गेला, तेव्हा तिने जे पाहिलं ते धक्कादायक होतं. ज्या जोडीदारासोबत ती राहात होती त्याने तिला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं आणि तिला पूर्णपणे विसरला होता.

ब्रीला तिच्या होणाऱ्या पतीचा आणि त्याच्या नवीन गर्लफ्रेंडचा एक मेसेजही आला, ज्यामध्ये लिहिलं होतं की आता तो तिच्या आणि तिच्या मुलासोबत राहू लागला आहे आणि ब्रीने त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू नये. द मिररशी बोलताना ब्री म्हणाली, 'मी हॉस्पिटलमध्ये असल्यापासून त्याच्याशी बोलले नव्हते. तो मला मध्येच सोडून गेला. काय झालं ते मलाही समजलं नाही.' त्यावेळी कोरोनाच्या निर्बंधांमुळे तिचे आई-वडीलही तिला भेटायला ऑस्ट्रेलियाहून येऊ शकले नाहीत, हेही तिच्यासाठी अतिशय वाईट होतं. अपघातानंतर पाच महिन्यांनी ब्री आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: australian woman wakes up from coma find fiance moved in with someone else

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.